अमिताभ सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात त्यावरून असे दिसून येते की त्यांचा काळ अजून संपला नाही आहे. पुढचे १० ते १५ वर्ष तरी ते असेच चित्रपट करत राहतील. आता लवकरच अमिताभ बच्चन साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी बरोबर तेलगू चित्रपटात दिसणार आहे. हा त्यांचा पहिला चित्रपट असेल ह्या चित्रपटाचे चित्रीकरण करताना अमिताभ बच्चन नुकतेच हैदराबादमध्ये दिसले. हा चित्रपट स्वत्रंतता सेनानी नारसिंम्हा रेड्डी ह्याच्या जीवनावरवर आधारित आहे. या चित्रपटाचे नाव 'सई रा नारसिम्हा रेड्डी' असे आहे. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाबद्दलची माहिती आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली. ते म्हणाले की ' ते चिरंजीवीच्या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून येणार आहेत' पुढे अमिताभ असे म्हणतात "प्रिय चिरंजीवी मी तुझ्या विनंतीला मान देऊन पाहुणे कलाकाराची भूमिका करण्यासाठी हैद्राबादला येतो आहे, मी इतिहासातील सर्वात शूर व्यक्तीची भूमिका करणार आहे" ह्या चित्रपटातील अमिताभ यांनी आपला लूक सुद्धा शेअर केला आहे त्यात अमिताभ लांब दाढी मध्ये दिसत आहे.ALSO READ : आत्तापर्यंत रिलीज झालेला नाही अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ सिनेमा! बिग बी म्हणाले, प्लीज असे करू नका!!लवकरच अमिताभ आणि ऋषी कपूर यांची जोडी २७ वर्षांनंतर चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘१०२ नॉट आऊट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाची कथा एका गुजराती नाटकावर आधारित आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना मेकअपसाठी तीन तास लागायचे.T 2757 -సూపర్ స్టార్ చిరంజీవి అదే ఫ్రేమ్ లో ఒక గౌరవం ఉండాలి pic.twitter.com/E2R2xKnm2C— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 28, 2018
लवकरच दक्षिण भारतीय चित्रपटात झळकणार बिग बी अमिताभ बच्चन, शेअर केला हा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 17:05 IST
अमिताभ बच्चन या वयात ही एवढ्या चित्रपटात काम करत आहेत तेवढे अजूनपर्यंत कोणत्याच अभिनेत्याने केले नसले. बॉलिवूडमध्ये शेहनशहचे पद ...
लवकरच दक्षिण भारतीय चित्रपटात झळकणार बिग बी अमिताभ बच्चन, शेअर केला हा फोटो
अमिताभ बच्चन या वयात ही एवढ्या चित्रपटात काम करत आहेत तेवढे अजूनपर्यंत कोणत्याच अभिनेत्याने केले नसले. बॉलिवूडमध्ये शेहनशहचे पद सांभाळणारे अमिताभ बच्चन यांचा कसदार अभिनय आज अनेक चित्रपटात बघायला मिळतो. आता अमिताभ यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडच्या चित्रपटांकडे वळवला आहे. अमिताभ लवकरच सुपरस्टार चिरंजीवी बरोबर तेलगू चित्रपटात दिसणार आहेत. ह्या तेलगू चित्रपटाशी निगडित अमिताभ यांचा लूक आऊट झाला आला आहे.