Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिप्स पाळत नाही ‘डाएट प्लान’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 16:00 IST

बॉलिवूड नट्या त्यांचे आरोग्य आणि सौंदर्याबद्दल कमालीच्या जागरूक आहेत. थोडंही वजन वाढलं की, अनेक नट्या अस्वस्थ होतात. मग काय ...

बॉलिवूड नट्या त्यांचे आरोग्य आणि सौंदर्याबद्दल कमालीच्या जागरूक आहेत. थोडंही वजन वाढलं की, अनेक नट्या अस्वस्थ होतात. मग काय ? रात्रंदिवस फक्त डाएट आणि डाएट प्लान. मोजूनमापून खाणे आणि अनेक आवडत्या गोष्टींचा त्याग.  पण, तुम्हाला माहितीये? बिपाशा बसू या यादीत अजिबात नाहीयं.लग्नानंतरही ती इतकी हॉट आणि सेक्सी दिसत असली तरी त्यामागे डाएट मात्र नक्कीच नाही. किंबहुना ‘डाएट प्लान’ची बंधनं न पाळणं, हेच तिच्या हॉट बॉडीचे रहस्य आहे.  ‘प्रत्येकाने खावे, प्यावे, मज्जा करावी, असे तिचे साधे-सोपे गणित आहे. त्यामुळे ती मस्तपैकी आवडेल ते खाते, पिते आणि मज्जा करते. अर्थात जेवढं खाते, त्याच्या दुप्पट व्यायामही करते.  बिपाशाच्या म्हते, व्यक्तीने हेल्दी फुड खावे. डाएट प्लान बदलावा पण व्यायामाचा कंटाळा करू नये. अति डाएट केल्यास त्याचा आपल्या मनावरही परिणाम होतो. त्यामुळे  निरोगी राहण्यासाठी, स्वस्थ जेवण घ्यावे.’