Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्या खोसला कुमारच्या आईचं निधन, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 12:16 IST

दिव्याने आईसोबतचा एक जुना फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसला कुमारच्या आईचं निधन झालं आहं. गुरुवारी, दिव्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर  ही दु:खद बातमी शेअर केली. दिव्याने आईसोबतचा एक जुना फोटो शेअर करत भावूक नोट लिहिली. दिव्याने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अनेक झलक आहेत, ज्यात तिचा मुलगाही दिसत आहे.

दिव्या खोसला कुमारने लिहिले, 'काही वेळापूर्वी मी माझी आई गमावली, ज्यामुळे माझ्या आयुष्यात कायमची एक पोकळी निर्माण झाली आहे. तुझे आशीर्वाद आणि नैतिक मूल्ये कायम माझ्यासोबत राहितील. तू सर्वात सुंदर आत्मा आहेस, मी तुझी मुलगी आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मी तुझ्यावर प्रेम करते आई. ओम शांती.'

दिव्याच्या या पोस्टवर  मोनालिसा, उर्वशी रौतेला यांच्यासह अनेक स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे. दिव्या आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आहे. तिने अक्षय कुमारपासून जॉन अब्राहमपर्यंतच्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक चित्रपट दिग्दर्शक देखील आहे. त्यांनी यारियां आणि सनम रे सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

2004 साली अनिल शर्माच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथींयों’ या चित्रपटाद्वारे दिव्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. याचवर्षी ‘लव्ह टुडे’ या साऊथच्या चित्रपटाद्वारे तिने टॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. दिव्याने ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटातून कमबॅक केलं होतं. या चित्रपटात दिव्या मुख्य हिरोईनची भूमिका साकारताना दिसली होती. 2005 मध्ये तिने टी सीरिजचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारसोबत लग्न केलं. दोघांनाही एक मुलगा झाला. लग्नानंतर दिव्याने अभिनय सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. रॉय, खानदानी शफाखाना, बाटला हाऊस, मरजांवा असे अनेक चित्रपटाची निर्मिती तिने केली.

टॅग्स :दिव्या कुमारभुषण कुमार