Join us

क्या व्हाईटवॉश किया है?  भूमी पेडणेकरचे फोटोशूट अन् नेटक-यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 14:59 IST

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सतत चर्चेत असते. पण सध्या तिचा एक फोटो चर्चेत आहे.

ठळक मुद्देभूमी लवकरच ‘सांड की आंख’ या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सतत चर्चेत असते. पण सध्या तिचा एक फोटो चर्चेत आहे. होय, सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चांगली चर्चा होताना दिसतेय. त्याचे झाले असे की, भूमीने नुकतेच वोग इंडिया या मासिकासाठी एक फोटोशूट केले. वोग इंडियाच्या कव्हरपेजवरचा हा फोटो पाहून भूमी निश्चित सुखावली असेल पण चाहते मात्र खवळले. मग काय भूमी चांगलीच ट्रोल झाली.

या फोटोमध्ये भूमी व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिने डार्क रंगाची लिपस्टिक लावली आहे. हा फोटो पाहिला आणि काही जणांनी भूमीला ट्रोल करणे सुरु केले.  याचे कारण म्हणजे, वोग इंडियाच्या कव्हर पेजवरच्या या फोटोत भूमी एकदम वेगळी दिसतेय.  अति मेकअपमुळे ओरिजनल लूकपेक्षा तिचा लूक वेगळा भासतोय. नेमक्या याच कारणाने अनेकांनी भूमीला लक्ष्य केले.

क्या व्हाईटवॉश किया है? असे हा फोटो पाहून एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने ‘बेकार फोटोशॉप’ अशी प्रतिक्रिया दिली. ‘फोटोशॉपचा इतकाही वापर करू नये की, खरा चेहराच बदलेल,’ अशी खोचक कमेंट अन्य एका युजरने केली.  काही लोकांनी तर या फोटोमध्ये दिसणारी भूमी पेडणेकर नाहीच,अशी देखील प्रतिक्रिया केली आहे. अर्थात भूमीच्या काही ‘डाय हार्ट’ फॅन्सनी या फोटोचे कौतुकही केले.

भूमी लवकरच ‘सांड की आंख’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तापसी पन्नू ही सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. शूटर दादी नावाने ओळखल्या जाणा-या दोन महिलांची भूमिका त्या साकारत आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी शूटींगची सुरुवात करणा-या या शूटर दादींनी अनेक मेडल जिंकले आहेत.

टॅग्स :भूमी पेडणेकर