Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूमी पेडणेकर अचानक दिसायला लागली इतकी सुंदर? ब्युटी अ‍ॅप्स की आणखी काही??

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 22:01 IST

भूमी पेडणेकर एक गुणी अभिनेत्री आहे, यात वादचं नाही. तिच्या अभिनयाबद्दल कुठलीही शंका घ्यायला वाव नाही. पण भूमीच्या एका गोष्टीवर मात्र शंका घेतली जातेय. होय, ही गोष्ट कुठली तर भूमीच्या सुंदर सुंदर सेल्फी. 

भूमी पेडणेकर एक गुणी अभिनेत्री आहे, यात वादचं नाही. तिच्या अभिनयाबद्दल कुठलीही शंका घ्यायला वाव नाही. पण भूमीच्या एका गोष्टीवर मात्र शंका घेतली जातेय. होय, ही गोष्ट कुठली तर भूमीच्या सुंदर सुंदर सेल्फी. होय, भूमीच्या सोशल अकाऊंटला भेट दिल्यावर भूमीच्या सुंदर सुंदर सेल्फी दिसतात. पण हे सेल्फी बघितल्यावर ही भूमीचं काय, इतपतं शंका येते. कारण या सेल्फीमध्ये भूमीला ओळखणेही कठीण जाते. आम्ही भूमीच्या लूकबद्दल नाही तर तिच्या इतक्या गोऱ्या गो-या नितळ सेल्फीबद्दल बोलतोय. आमचा इशारा तुम्ही ओळखला असेलच.

 होय, भूमीचे हे सगळे सेल्फी पाहिल्यानंतर ती यासाठी कुठली डिजिटल मदत तर घेत नाही ना, अशी शंका येते. डिजिटल हेल्प म्हणजेचं ब्युटी अ‍ॅप्स. तुमचा चेहरा आहे त्यापेक्षा अधिक सुंदर भासवणा-या अनेक ब्युटी अ‍ॅप्स एका क्लिकवर उपलब्ध आहेत. सध्या भूमीबद्दल हीच शंका घेतली जातेय. खरे तर सुंदर दिसावे, असे प्रत्येकालाचं वाटते. त्यात काहीही गैर नाही. मेकअप वा सेलिब्रिटी घेतात त्या वेगवेगळ्या ब्युटी थेरपींना आमचा विरोध नाहीच. आमचे केवळ एकचं म्हणणे आहे, चाहत्यांनी तुम्हाला ओळखूनही नये, इतपत कुठल्याच गोष्टीचा अतिरेका व्हायला नकोय.लवकरच भूमी करण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय रणवीर सिंग, करिना कपूर, अनिल कपूर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट असे अनेकजण आहेत.

टॅग्स :भूमी पेडणेकर