Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूमी पेडणेकरने लॉकडाउनचा वेळ लावला सत्कारणी, घरीच पिकविला भाजीपाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 13:25 IST

भूमी पेडणेकरने घरीच पिकविला भाजीपाला

कोरोना व्हायरसचा भारतातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात 3 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कामकाज तसेच शूटिंगदेखील बंद आहेत. कलाकारदेखील आपापल्या घरात कैद आहेत आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहेत. त्यात तर भूमी पेडणेकरने तिची शेती करण्याची इच्छा पूर्ण केली आहे. तिने घरातच भाजीपाला पिकविला आहे आणि त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. 

भूमी पेडणेकरने घरी पिकवलेल्या भाज्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. जे पाहिल्यावर तुम्ही चकीत व्हाल आणि तिचे कौतूक केल्याशिवाय राहणार नाहीत. तिने घरच्या घरी मेथी, हिरवी मिरची, वांगी आणि स्ट्रॉबेरी यांची रोपे छोट्या छोट्या कुंड्यामध्ये लावली आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, बरीच वाट पाहिल्यावर आणि बरीच काळजी घेतल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर हे सादर करत आहोत. यासोबत भूमीने #PednekarKePed हा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी तिने याबद्दल सांगितले होते की, मला व माझ्या आईला नेहमीच एक हाइड्रोपोनिक्स गार्डन बनवायचे होते. जिथे भाज्यांचे पीक घ्यायचे होते. स्थायी जीवनशैलीचा आनंद घ्यायचा होता. आम्हाला एक बाग हवी होती म्हणजे स्वतःची दिनचर्या घरापर्यंत आणू शकतो. आता आम्ही या विकासामुळे खूप खूश आहे.त्यानंतर एका महिन्यानंतर भूमीने शेअर केलेले फोटो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. 

वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर भूमी लवकरच करण जोहरच्या तख्तमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :भूमी पेडणेकर