Join us  

भूत पार्ट १- द हाँटेड शीपच्या टीमने प्रमोशनसाठी वापरलाय हा अनोखा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 6:00 AM

भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या या चित्रपटाची टीम करत असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमने विविध फंडे वापरले आहेत.

ठळक मुद्देभूत पार्ट १- द हाँटेड शीपच्या टीमने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक मोठी वाळूची शिप देखील समुद्रकिनारी बनवली होती आणि या शिपला भेट देण्यासाठी खास विकी गेला होता. 

विकी कौशलच्या भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटात त्याच्या चाहत्यांना त्याचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून सध्या याच ट्रेलरची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या या चित्रपटाची टीम करत असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमने विविध फंडे वापरले आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक भन्नाट कल्पना चित्रपटाच्या टीमने शोधली होती. भूत स्केअर्स नावाचे एक अभियान या चित्रपटाच्या टीमद्वारे सुरू केले होते. याद्वारे लोकांना घाबरवण्यासाठी काही व्हिडिओज बनवण्यात आले आणि हे व्हिडिओ विकी आणि या चित्रपटाच्या टीमने आपापल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केले होते. सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी हा अनोखा फंडा वापरण्यात आला.

आजकाल मॉलमध्ये आपल्याला एक गेम पाहायला मिळतो. तुमच्या डोळ्यावर गॉगल लावून तुम्हाला एक व्हिडिओ दाखवण्यात येतो. हा व्हिडिओ पाहाताना आपण त्या व्हिडिओत दाखवलेल्या ठिकाणी आहोत असे आपल्याला वाटते. हाच व्हीआर व्हिडिओ खास भूत पार्ट १- द हाँटेड शीपच्या टीमने लाँच केला होता. हा व्हिडिओ पाहाताना तुम्ही विकी कौशलसोबत एखाद्या भयानक ठिकाणी आहात असे तुम्हाला वाटते. सध्या याच व्हिडिओची विकीच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

भूत पार्ट १- द हाँटेड शीपच्या टीमने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक मोठी वाळूची शिप देखील समुद्रकिनारी बनवली होती आणि या शिपला भेट देण्यासाठी खास विकी गेला होता. 

भूतः द हाँटेड शिपच्या ट्रेलरमध्ये एक जहाज आणि त्यावर घडत असलेल्या विचित्र घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ट्रेलर थरकाप उडवणारा असून या ट्रेलरमध्ये आपल्याला विकी कौशल, आशुतोष राणा, भूमी पेडणेकर यांना पाहायला मिळाले होते.

भूतः द हाँटेड शिप या ट्रेलरमध्ये आपल्याला एक भलेमोठे जहाज दिसत असून हे जहाज अचानक समुद्रकिनारी मिळाले आहे. या जहाजात काय आहे हे पाहाण्यासाठी एक ऑफिसवर (विकी कौशल) त्याच्या आत जातो. पण त्याच्या आजूबाजूला अनेक सावल्या, भूतं आपल्याला फिरताना दिसतात. या ट्रेलरमध्ये एक बाई आणि मुलगी दिसत असून हे कोण आहेत असा प्रश्न नक्कीच पडतो. हा ट्रेलर पाहाताना आपल्या अंगावर काटा येतो यात काहीच शंका नाही.

भूतः द हाँटेड शिप या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केले असून धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भूत हा धर्मा प्रोडक्शन आणि विकी कौशलचा पहिला हॉरर चित्रपट असून हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :विकी कौशलभूत चित्रपट