Join us

१५ दिवसांतच ओटीटीवर रिलीज होणार 'भूल चूक माफ'! कधी आणि कुठे पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:41 IST

२३ मे रोजी 'भूल चूक माफ' थिएटरमध्ये आला होता. मात्र, आता हा सिनेमा लगेचच ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'भूल चूक माफ' सिनेमाच्या ओटीटी रिलीजबाबत अपडेट समोर आली आहे.

राजकुमार राव आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत असलेला 'भूल चूक माफ' हा सिनेमा अलिकडेच सर्वत्र प्रदर्शित झाला. २३ मे रोजी 'भूल चूक माफ' थिएटरमध्ये आला होता. सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही होत होती. मात्र, आता हा सिनेमा लगेचच ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'भूल चूक माफ' सिनेमाच्या ओटीटी रिलीजबाबत अपडेट समोर आली आहे. 

'भूल चूक माफ' सिनेमा रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. ट्रेलरपासूनच सिनेमाबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. राजकुमार-वामिकाची जोडीही चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. थिएटरमध्येही सिनेमा चांगली कमाई करत होता. अशातच आता लवकरच 'भूल चूक माफ' प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'भूल चूक माफ' रिलीज होणार आहे. ६ जूनला राजकुमार राव आणि वामिका गब्बीचा 'भूल चूक माफ' ओटीटीवर प्रदर्शित होईल. 

'भूल चूक माफ' सिनेमा काही दिवसांसाठीच थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा सुरुवातीला ९ मे रोजी रिलीज होणार होता. मात्र भारत-पाकिस्तान तणावामुळे सिनेमा थिएटरमध्ये रिलीज न करता ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. त्यानंतर पुन्हा २३ मे रोजी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला गेला. या ७ दिवसांत 'भूल चूक माफ'ने ४४ कोटींचा बिजनेस केला आहे.  'भूल चूक माफ' सिनेमाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली आहे. या सिनेमात राजकुमार राव, वामिका गब्बी, संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर करण शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

टॅग्स :राजकुमार रावसिनेमा