Join us
Daily Top 2Weekly Top 5

भोली पंजाबन ऋचा चढ्ढाने म्हटले, ‘लैंगिक शोषण करणाऱ्यांची आता नावे सांगू शकते, पण...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 21:11 IST

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने बॉलिवूडमध्ये लैंगिक शोषण केले जात असल्याचे धाडसाने सांगितले, परंतु असे करणाºयांचे जर नाव जाहीर ...

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने बॉलिवूडमध्ये लैंगिक शोषण केले जात असल्याचे धाडसाने सांगितले, परंतु असे करणाºयांचे जर नाव जाहीर केले तर कदाचित काम मिळणे बंद होईल, असे तिला वाटते. ऋचाने म्हटले की, ‘लैंगिक शोषणाबद्दल ब्लॉक पोस्ट केल्याने माझ्यावर निशाणा साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही स्त्रीवादी लोकांकडून मला असे विचारण्यात आले की, जर तुझे लैंगिक शोषण केले गेले तर तू त्यांचे नाव का सांगत नाहीस? ऋचाने एक न्यूज एजन्सीला मुलाखत देताना म्हटले की, ‘जर तुम्ही मला आयुष्यभर पेन्शन देऊ शकाल, माझी सुरक्षा आणि माझ्या परिवाराचा सांभाळ करू शकाल तसेच मला चित्रपट आणि टीव्हीवर काम मिळण्यास कुठलीच अडचण येणार नाही, माझे करिअर यापुढेही असेच सुरू राहील असे जर खात्रीपणे सांगितले तर मी त्या व्यक्तीचे लगेचच नाव जाहीर करेल.’पुढे बोलताना ऋचाने म्हटले की, केवळ मीच नाही तर इतरही बरेचशा अभिनेत्री लैंगिक शोषण करणाºयांच्या नावांचा भांडाफोड करतील. परंतु करिअर उद््ध्वस्त होईल, या भीतीने असे करण्याचे कोणी धाडस करणार नाही.’ ऋचाच्या मते, आपल्या चित्रपटसृष्टीत अशाप्रकारची व्यवस्था नाही, जेणेकरून पीडितेला सुरक्षा मिळेल. जेव्हा मी या विषयावर बोलते तेव्हा नाव जाहीर करण्यासाठी मला अनेकांकडून प्रतिक्रिया येतात. जर माध्यमांना अशा लोकांची नावे माहिती असतील तर ते का बरं याबाबतचा उलगडा करीत नाहीत? असा सवालही ऋचाने उपस्थित केला. ऋचाने म्हटले की, जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार करतो तेव्हा लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होते. त्यामुळे इंडस्ट्रीमधील व्यवस्था बदलायला हवी. अभिनेत्रींकरिता रॉयल्टी नसल्याने अन् कायद्यातील पळवाटांमुळे अशाप्रकारची रिस्क घेण्याचा कोणीही विचार करणार नाही. मला न्याय मिळेल याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळेच मी माझ्या मनातील गोष्ट जाहीरपणे सांगितली. परंतु मला असे वाटते की, जगभरातील घटनांमुळे मी कदाचित भावुक झाली. दरम्यान, ऋचाच्या या खुलाशामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली असून, ऋचाने संबंधितांची नावे जाहीर करावी, अशी मागणी तिच्याकडे केली जात आहे. जर ऋचाने या नावांचा खुलासा केला तर नक्कीच इंडस्ट्रीत भूकंप येईल, यात शंका नाही.