Join us
Daily Top 2Weekly Top 5

रवी किशनची लेक रीवा किशनचे फोटो पाहिलेत?  या चित्रपटातून होतोय डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 08:00 IST

भोजपुरी सुपरस्टार रवी किशन याची मुलगी रीवा किशन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे.

ठळक मुद्देरीवाने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या प्ले ग्रूपसोबत तिने एक वर्षे घालवले.

भोजपुरी सुपरस्टार रवी किशन याची मुलगी रीवा किशन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. होय, ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून रीवा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समोर आले. या चित्रपटात रीवाचा हिरो आहे प्रियांक शर्मा. प्रियांक शर्माचाही हा डेब्यू सिनेमा आहे. प्रियांक हा बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे व निर्माता प्रदीप शर्मा यांचा मुलगा आहे.

रीवा व प्रियांकशिवाय अक्षय खन्नाचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. करण विश्वनाथ कश्यप या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 3 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

करण कश्यप या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि निमार्ता नितीन मनमोहन यांची मुलगी प्राची ही या चित्रपटाची निर्माती आहे. नितीन मनमोहन यांनीच रवी किशन यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. नितीन यांनी रवी किशनचा पहिला सिनेमा ‘आर्मी’ प्रोड्यूस केला होता. हा चित्रपट 1996 मध्ये रिलीज झाला होता. आता नितीन मनमोहन यांची मुलगी रवी किशनच्या मुलीला ब्रेक देणार आहे. 

साहजिकच आपल्या बॉलिवूड डेब्यूबद्दल रीवा कमालीची उत्सूक आहे. मला फोन कॉल आला, तेव्हा मी अमेरिकेत होते. पापांचे मित्र मोईन बेग अंकल यांचा मला फोन आला आणि त्यांनीच मला ही आनंदाची बातमी दिली,असे रीवाने एका मुलाखतीत सांगितले होते.

रीवाने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या प्ले ग्रूपसोबत तिने एक वर्षे घालवले. अमेरिकेतील अ‍ॅक्टिंग स्कूलमध्येही तिने अभिनयाचे धडे गिरवले. इतक्या तयारीनंतर रीवा बॉलिवूडसाठी सज्ज झाली आहे. आता तिचे हे पदार्पण किती यशस्वी ठरते, ते बघूच.

टॅग्स :रवी किशन