Join us

"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 09:10 IST

भोजपुरी अभिनेता आणि सिंगर असलेला पवन सिंहने मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया दिली आहे. जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही, असं पवन सिंह बरळला आहे. 

त्रिभाषा सूत्रावरुन हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यापासून सुरू झालेला वाद हा आता मराठी विरुद्ध हिंदीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये मराठी-हिंदीवरुन मनसे कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय व्यापाराला मारहाण केली. त्यानंतर अनेकांनी मराठी-हिंदी वादात उडी घेत आपलं मत व्यक्त केलं. आता भोजपुरी अभिनेता आणि सिंगर असलेला पवन सिंहने मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया दिली आहे. जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही, असं पवन सिंह बरळला आहे. 

काय म्हणाला भोजपुरी अभिनेता? 

माझा जन्म बंगालमध्ये झाला. पण तरी मला बांगला भाषा येत नाही. मला वाटत नाही की ही भाषा मी कधी शिकू शकेन. म्हणून मी बांगला भाषेत बोलतही नाही. मला मराठीही येत नाही. मला हिंदी बोलायचा अधिकार आहे. महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी आलंच पाहिजे म्हणणं हा घमंड आहे. मी काम करण्यासाठी मुंबईत येतो. जास्तीत जास्त काय होईल लोक मारतील. मरणाची भीती नाही. मला मराठी येत नाही. जीव घेतला तरी मराठी बोलणार नाही. 

पवन सिंह हा भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक आणि अभिनेता आहे. त्याची अनेक गाणी व्हायरल झाली आहेत. स्त्री २ या सिनेमातही त्याने गाणं गायलं होतं.  काटी रात मैने खेतो मे तू आई नही हे गाणं त्याने गायलं होतं. पवन सिंहचं हे गाणंही हिट झालं होतं. 

टॅग्स :सेलिब्रिटी