Join us

‘भारत’मधून चाहत्यांना मिळणार ‘ही’ ट्रीट; दिग्दर्शकाने टिवटरवरून शेअर केली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 18:59 IST

सध्या सलमान खान सध्या आपल्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ७ जूनला ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान चित्रपटात असल्यावर जबरदस्त स्टंटस सीन्स बघायला मिळणार नाहीत, असे होणार नाही. सध्या सलमान खान सध्या आपल्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ७ जूनला ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात सलमान ‘मौत के कुएं’ मध्ये बाइक चालवताना दिसणार आहे. भारतचे डायरेक्टर अली अब्बास जफरने ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना अली अब्बास जफरने ट्वीट केले आहे की, ‘नुकतेच भारत चित्रपटातील ‘मौत का कुआं’ हा सीन शूटिंग पुर्ण झाला आहे. हा सीन उत्तर प्रदेशच्या साहसी स्टंट राडडर्सने सलमान खानसोबत मिळून पुर्ण केला आहे. त्याने लिहिले की, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात रोमांचकारी अ‍ॅक्शन सीन होता. या चित्रपटात सलमान खान १८ वर्षांपासून ते ७० वर्षांपर्यंतच्या अवतारात दिसणार आहे. कारण या चित्रपटात सलमान ज्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे, तो चित्रपटा दरम्यान त्याच्या वयाचे ५२ टप्पे पार करणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ आहे. सलमानसोबतचा कॅटरिनाचा हा ६ वा चित्रपट असणार आहे. यापुर्वी दोघं मैंने प्यार क्यूं किया, पार्टनर, युवराज, एक था टाइगर आणि टाइगर जिÞन्दा है मध्ये एकत्र दिसले होते.

टॅग्स :भारत सिनेमाकतरिना कैफसलमान खान