रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या सिनेमात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री भाग्यश्री या सिनेमात माँसाहेब जिजाऊ यांची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये भाग्यश्रीच्या भूमिकेची झलकही पाहायला मिळाली. 'राजा शिवाजी' सिनेमामुळे भाग्यश्रीला प्रेम मिळत आहे. सिनेमाच्या रिलीजआधी भाग्यश्री कुटुंबीयांसह गुजरातच्या सोमनाथ मंदिरात पोहोचली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
भाग्यश्रीने कुटुंबीयांसह सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. शिवलिंगाला दुग्धाभिषेक करत भाग्यश्रीने कुटुंबीयांसह मनोभावे शंकाराच्या पिंडीची पूजाही केली. सोमनाथ मंदिरातील भाग्यश्रीचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. अभिनेत्रीचा साधेपणा पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. भाग्यश्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'राजा शिवाजी' सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही रितेशनेच केलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात भाग्यश्री, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, विद्या बालन हे बॉलिवूड कलाकार झळकणार आहेत. रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख राणी सईबाईंची भूमिका साकारणार आहे. याशिवाय सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे. महेश मांजरेकर, शिवानी मुंढेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, कपिल होनराव हे मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Web Summary : Before 'Raja Shivaji' release, Bhagyashree, playing Jijaऊ, visited Somnath with family. The film stars Riteish Deshmukh as Shivaji, along with Abhishek Bachchan and Sanjay Dutt. Genelia D'Souza will play Rani SaiBai. Releasing May 1st, it features Marathi actors like Mahesh Manjrekar.
Web Summary : 'राजा शिवाजी' की रिलीज से पहले, जिजाऊ की भूमिका निभा रहीं भाग्यश्री ने परिवार के साथ सोमनाथ का दौरा किया। फिल्म में रितेश देशमुख शिवाजी के रूप में हैं, साथ ही अभिषेक बच्चन और संजय दत्त भी हैं। जेनेलिया देशमुख रानी साईबाई की भूमिका निभाएंगी। 1 मई को रिलीज हो रही है, इसमें महेश मांजरेकर जैसे मराठी कलाकार हैं।