Join us
Daily Top 2Weekly Top 5

बर्फाळ डोंगरात भाग्यश्रीने नवऱ्यासोबत श्रीदेवीच्या गाण्यावर केला रोमँटिक डान्स, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 19:53 IST

अभिनेत्री भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती नवरा हिमालय दसानीसोबत काश्मीरच्या बर्फाळ डोंगर भागात रोमान्स करताना दिसली.

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री सध्या काश्मीरमध्ये असून तिथले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात ती नवरा हिमालय दसानीसोबत कश्मीरच्या बर्फाळ डोंगरात रोमान्स करताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

भाग्यश्रीने नवऱ्यासोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हे खूप सुंदर होते, त्यामुळे आम्ही यशजींच्या सिनेमा चाँदनीमधील आवडते गाणे रिक्रिएट केले, जे गाणे श्रीदेवी आणि ऋषी कपूरवर चित्रीत केले गेले होते. दोघेही माझे फेव्हरिट कलाकार आहेत. त्यांना खूप मिस करते. नवऱ्याला तोपर्यंत त्रास दिला जोपर्यंत तो या गाण्यावर माझ्यासोबत डान्स करायला तयार नव्हता. जोपर्यंत जीवन जगू शकतो तोपर्यंत प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या, उद्याचे कुणाला काय माहित. अशापद्धतीने हे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहे. 

भाग्यश्री लवकरच प्रभास सोबत राधेश्याम चित्रपटात दिसणार आहे. पहिल्यांदा प्रभाससोबत काम करण्याबाबत भाग्यश्रीने सांगितले की, प्रभास तिचा 'मैने प्यार किया' सिनेमा बघून तिचा फॅन झाला होता. एका न्यूज चॅनलसोबत बोलताना भाग्यश्रीने सांगितले की, प्रभासने 'मैने प्यार किया' बघितल्याचं सांगितलं होतं. आणि म्हणाला होता की, तो आनंदी आहे त्याला 'राधे श्याम'मध्ये क्रशसोबत काम करण्याची संधी मिळत आहे.

भाग्यश्रीने सांगितलं की, प्रभास फारच फूडी आहे आणि सेटवर लोकांना मस्त जेवण खाऊ घालतो. त्यांनी सांगितले की, शूटच्या शेवटच्या दिवशी प्रभासने त्यांच्यासाठी फारच चांगल्या डिशेज बनवल्या होत्या. टेबलवर १५ डिश होत्या. ती प्रभासला म्हणाली की, इतकं नाही खाऊ शकत तर सगळं थोडं थोडं ट्राय करू शकता. जेवण घरी तयार केलेलं आहे. त्याने हैद्राबादी मिठाई सुद्धा ऑर्डर केली होती. १५-२० डब्यात वेगवेगळ्या प्रकारची मिठाई होती.

टॅग्स :भाग्यश्री