Join us

साध्याभोळ्या सचिवजींचा भयानक अवतार! जितेंद्र कुमार-अर्शद वारसीच्या 'भागवत'चा जबरदस्त ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:00 IST

'भागवत' सिनेमाचा ट्रेलर समोर आला असून सिनेमाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सचिवजींचा भयानक अवतार पाहून सर्वच थक्क झालेत

काही दिवसांपूर्वी अभिनेता जितेंद्र कुमारचा आगामी सिनेमा 'भागवत'चा टीझर रिलीज झाला. या टीझरमध्ये जितेंद्र कुमारचा आजवर कधीही न पाहिलेल्या अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अशातच 'भागवत'चा बहुचर्चित ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये 'पंचायत'मधील साध्याभोळ्या सचिवजींचा आजवर कधीही न पाहिलेला भयानक अवतार पाहायला मिळतोय. काय आहे या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये?'भागवत'चा ट्रेलर

'भागवत'च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसतं की, अर्शद वारसीची आक्रमक पोलीस अधिकारी म्हणून शहरात ओळख असते. अर्शद वारसी ज्या तुरुंगात असतो तिथे तो एका कैद्याला इतका मारतो की त्यातच त्याचा मृत्यू होतो. अशातच अर्शदकडे मुलगी बेपत्ता झाल्याची एक तक्रार येते. तुमची मुलगी मी १५ दिवसाच्या आत परत आणेल, असं अर्शद त्या मुलीच्या बापाला वचन देतो.

पुढे ट्रेलरमध्ये जीतूची एन्ट्री होते. साधाभोळा दिसणारा जीतू एका मुलीच्या प्रेमात पडतो. दोघांमध्ये रोमँटिक सीन दिसतात. त्यानंतर अर्शद जीतूला अटक करतो. अनेक मुलींचं अपहरण केल्याचा आरोप जीतूवर लावण्यात येतो. जीतूविरुद्ध ही केस कोर्टात जाते. कोणत्याही वकीलाची मदत न घेता जीतू स्वतःच ही केस लढवायचं ठरवतो.

पुढे ट्रेलरमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न दिसतात. याशिवाय जीतूचे लिपलॉक सीन पाहायला मिळतात. जीतूचा हा भयानक अवतार पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. याशिवाय अर्शद वारसी आणि जीतूच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळतेय. हा सिनेमा झी ५ या ओटीटीवर रिलीज होणार आहे. १७ ऑक्टोबरला हा क्राईम थ्रिलर सिनेमा ओटीटीवर बघायला मिळेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagwat Trailer: Jitendra Kumar's terrifying transformation shocks, Arshad Warsi stars.

Web Summary : Jitendra Kumar's 'Bhagwat' trailer unveils a shocking transformation. Arshad Warsi, as a cop, investigates a missing girl case leading to Jitendra. Accused of abduction, Jitendra fights his case. The ZEE5 thriller releases October 17th.
टॅग्स :बॉलिवूडवेबसीरिजअर्शद वारसीमृत्यू