Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रद्धाने का साजरी केली नाही भाऊबीज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 09:57 IST

भाऊबीज म्हणजे भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण. बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा आणि भावाला ओवाळून त्याच्याकडून हक्काची ‘ओवाळणी’ घेण्याचा हा ...

भाऊबीज म्हणजे भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण. बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा आणि भावाला ओवाळून त्याच्याकडून हक्काची ‘ओवाळणी’ घेण्याचा हा दिवस. बॉलिवूडमधल्या अनेक भाऊ-बहिणींनी आजचा हा दिवस उत्साहात साजरा केला. पण आपली चुलबुली श्रद्धा कपूर मात्र या आनंदाला मुकली.होय, श्रद्धा सध्या ‘रॉक आॅन2’च्या प्रमोशनमध्ये जाम बिझी आहे. फरहान अख्तर आणि तिची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे सध्या सर्वत्र जोरदार प्रदर्शन सुरु आहे. त्यामुळेच श्रद्धा आजची भाऊबीज साजरी करू शकली नाही. भाऊ सिद्धांतला ती ओवाळू शकली नाही.सीएनएक्स मस्ती’ मनमोकळ्या गप्पा मारताना खुद्द श्रद्धानेच ही माहिती दिली. आज भाऊबीज आहे. मी दरवर्षी सिद्धांतला ओवाळते. पण यावर्षी मी कमालीची बिझी आहे. आज मी सिद्धांतसोबत नाही. पण तो अतिशय समंजस आहे. मला तो नेहमी समजून घेतो. याहीवेळी तो मला नक्कीच समजून घेईल, हा माझा विश्वास आहे. आज नाही पण वेळ मिळेल तसा आम्ही हा सण नक्की साजरा करू, असे ती म्हणाली. सिद्धांतने तुला दिवाळीची काय भेट दिली? असे विचारल्यावर ती अजून मिळायचीयं, असे सांगत श्रद्धा खळखळून हसली.                                                   चित्रपट निर्माता अपूर्व लखिया यांच्या आगामी ‘'हसीना- द क्वीन आॅफ मुंबई’मध्ये श्रद्धा व सिद्धांत एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना हिच्यावर आधारित आहे. यात श्रद्धा हसीनाची तर सिद्धांत दाऊदची भूमिका साकारणार आहे. म्हणजेच रिअल लाईफ भाऊ-बहिणी पडद्यावरही भाऊ-बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहेत.