Join us

खबरदार! अजिबात भेटायचं नाही मलायकाला, अशी सलमानने अर्जुन कपूरला दिली होती सक्त ताकीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 17:10 IST

मलायका आणि अरबाजचे नाते वाचवण्यासाठी सलमान आणि सोहेल खानने खूप प्रयत्न केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणिअर्जुन कपूर यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतात. बऱ्याचदा ते एखाद्या इव्हेंट किंवा रेस्टॉरंटबाहेर स्पॉट होतात. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. या लग्नासाठी तिचा मुलगा अरहानचीदेखील परवानगी असल्याचे समजते आहे. मात्र या नात्यामुळे अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्या नात्यात फूट पडली आहे. 

मलायका अरोराने 2017 साली अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यावर त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. पण असेही सांगितले जाते की अरबाज आणि मलायकाचे लग्न तुटू नये म्हणून खान कुटूंबाने खूप प्रयत्न केले होते. इतकंच नाही तर सलमान खान आणि सोहेल खानने स्वतः जाऊन अर्जुन कपूरला सक्त ताकीद दिली होती की तू कधीच मलायकाला भेटायचे नाही.

असं सांगितलं जातं आहे की मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात वेडा झाली होती की त्याला सोडायलाही तयार नव्हती. त्यानंतरही अर्जुन कपूर आणि मलायका एकत्र स्पॉट झाले होते.

सलमान खानने समजावल्यानंतरही अर्जुन कपूर मलायका अरोरा एकत्र वेळ व्यतित करताना दिसले. त्यामुळे सलमान अर्जुन कपूरवर नाराज झाला. त्यानंतर सलमान आणि सोहेलने अर्जुन कपूरला भेटणे बंद केले आणि नेहमीसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका इव्हेंटमध्ये जेव्हा मलायका आणि अर्जुन एकत्र आले होते. त्याच इव्हेंटमध्ये सोहेल खानदेखील आला होता. जसे मलायका, अर्जुन सोहेलच्या समोर आले तेव्हा अर्जुन इव्हेंट सोडून जात होता. पण त्यापूर्वीच सोहेल तिथून निघून गेला आणि अर्जुन इव्हेंटमध्ये थांबला.

टॅग्स :सलमान खानअर्जुन कपूरमलायका अरोराअरबाज खान