IPL दरम्यान सेलिब्रिटींचा धिंगाणा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 12:50 IST
-रवींद्र मोरे भारतात क्रिकेटच्या सर्वात प्रसिद्ध सामन्यांमधला एक म्हणजे आयपीएल होय. काही दिवसांपासून आयपीएलची रणधुमाळी सुरु असून दर्शक क्रिकेट ...
IPL दरम्यान सेलिब्रिटींचा धिंगाणा !
-रवींद्र मोरे भारतात क्रिकेटच्या सर्वात प्रसिद्ध सामन्यांमधला एक म्हणजे आयपीएल होय. काही दिवसांपासून आयपीएलची रणधुमाळी सुरु असून दर्शक क्रिकेट सामन्यांचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. आयपीएल सर्वात जास्त पॉप्युलर होण्याचे मोठे कारण म्हणजे क्रिकेट आणि बॉलिवूडचे कॉम्बिनेशन होय. क्रिकेट चाहते आपले आवडते खेळाडू आणि आपले लाडके बॉलिवूड स्टार्सने खरेदी केलेल्या टिमला सपोर्ट करतात. मात्र ज्याठिकाणी एवढे एंटरटेनमेंट असेल त्याठिकाणी कंट्रोव्हर्सी न होणे, असे होऊ च शकत नाही. आजपर्यंत आयपीएल दरम्यान सेलिब्रिटींनी कोणत्या ना कोणत्या कारणांनी धिंगाणा घातला आहे. जाणून घेऊया त्याबाबत...* शाहरुख खान २०१२ मध्ये आयपीएल सामन्यांदरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे अधिकारी आणि कोलकाता नाईट रायडर्स टीमचे मालक बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान दरम्यान चांगलाच वाद झाला होता. शाहरुखने म्हटले होते की, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सिक्युरिटी गार्ड्सने त्याची मुलगी सुहानासोबत धक्का-बुक्की केली. मात्र अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, शाहरुखने मद्यपान केले होते त्यामुळे शाहरुखला स्टेडियममध्ये येण्यास मज्जाव केला होता.* प्रीति झिंटा बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटाने आपल्या बिजनेसमॅन बॉयफ्रेंड नेस वाडियासोबत एकत्रित आयपीएलमध्ये किंग्स इलेवन पंजाबची क्रिकेट टीम खरेदी केली होती. विशेष म्हणजे प्रीति आणि नेसचे अफेयर बऱ्याच दिवसापासून चर्चेत होते. मात्र दोन वर्षातच त्यांचे ब्रेकअप झाले. २०१४ मध्ये प्रीति झिंटाने नेस वाडियाच्या विरोधात पोेलिसात गुन्हा दाखल केला की, वाडियाने तिचे शोषण केले आणि तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. * विराट कोहली एका सामन्यादरम्यान जेव्हा पावसामुळे खेळ थांबविण्यात आला होता, तेव्हा विराट कोहली प्लेयर एरियामधून बाहेर पडून अनुष्का शर्माला भेटायला गेला होता. त्यावेळी विराट आणि अनुष्का एकमेकांना डेट करत होते. बीसीसीआयच्या नियमानुसार, सामन्यांदरम्यान खेळाडू प्लेयर एरियामधून बाहेर पडून आपला परिवार आणि मित्रांना भेटू शकत नाही, मात्र विराटने हा नियम तोडला होता. यावरुन विराटला अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. * दीपिका पादुकोण चॅलेंजर बॅँगलोरचे मालक विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याने, के के आर वर आपल्या टीमचा जबरदस्त विजय पाहून दीपिका पादुकोणला किस केले होते. विशेष म्हणजे सिद्धार्थने लाइव्ह टीव्हीवरच दीपिकाला किस केला होता ज्यामुळे खूपच वाद निर्माण झाला होता. * राज कुंद्रा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स टीमचे मालक राज कुंद्राने एक गोष्ट स्वीकारली होती की, त्याने सट्टेबाजेंद्वारा आपली आणि अन्य टीम्सवर पैसे लावले होते. यानंतर खूप वाद झाला होता आणि त्याच्या टीमला दोन वर्षांसाठी आयपीएलमधून बॅन करण्यात आले होते.