Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोंकणाच्या हिंदी सिनेमासाठी कल्की शिकली बंगाली भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 18:05 IST

होय, कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित चित्रपटात कल्की कोचलिन  एका अँग्लो-इंडियन महिलेची भूमिका साकारत आहे आणि याच भूमिकेसाठी कल्कीने बंगाली ...

होय, कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित चित्रपटात कल्की कोचलिन  एका अँग्लो-इंडियन महिलेची भूमिका साकारत आहे आणि याच भूमिकेसाठी कल्कीने बंगाली भाषेचे धडे गिरवले.कोंकणाच्या चित्रपटातील ही महिला अर्धी बंगाली आहे. त्यामुळे तिची भूमिका साकारायची तर बंगाली यायलाच हवी. मग काय, ही भाषा शिकण्याशिवाय कल्कीपुढे दुसरा पर्यायचं नव्हता. चित्रपटात काही बंगाली शब्द असल्याने कल्कीने अखेर ही भाषा शिकायचेचं ठरवले आणि त्यानुसार तिने मेहनतही घेतली. कोंकणा ह्यअ डेथ दन दी गंजह्ण हा चित्रपट घेऊन येतेय. यात कल्की, रणवीर शौरी, विक्रांत मेसी, ओम पुरी व तनुजा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हॉलीडे वर गेलेल्या पाच लोकांची ही कथा आहे. चित्रपटाची शूटींग पूर्ण झाली असून एडिटींगचे काम सुरु आहे.