Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत मिळाली या बंगाली अभिनेत्रीची डेथ बॉडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 19:03 IST

कोलकाता येथील कस्बा परिसरात एका बंगाली अभिनेत्रीची बॉडी फ्लॅटच्या सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत मिळाली. हाताची नस कापलेली तसेच शरीरावर जखमा ...

कोलकाता येथील कस्बा परिसरात एका बंगाली अभिनेत्रीची बॉडी फ्लॅटच्या सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत मिळाली. हाताची नस कापलेली तसेच शरीरावर जखमा असल्याने ही आत्महत्त्या की हत्त्या असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. २८ वर्षीय बितास्ता साहा असे या अभिनेत्रीचे नाव असून, बंगाली सिनेमांमध्ये ती सुपरिचित आहे. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बितास्ताची आई गेल्या दोन दिवसांपासून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र बितास्ता तिच्या फोन कॉल्सला उत्तर देत नव्हती. त्यामुळे तिच्या आई अधिक चौकशीसाठी थेट तिच्या फ्लॅटवर गेली. जिथे बितास्ता एकटीच राहात होती.  वारंवार बेल वाजवूनदेखील दरवाजा उघडला जात नसल्याने तिच्या आईने शेजाºयांच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. फ्लॅटमध्ये जाताच बितास्ताची बॉडी सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांच्या अंदाजानुसार तब्बल दोन दिवसांपासून बितास्ताची बॉडी लटकून असल्याने फ्लॅटमध्ये दुर्गंधी निर्माण झाली होती. शिवाय तिची बॉडी कुजण्यास सुरुवात झाली होती. यावेळी जेव्हा पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा बितास्ताच्या हाताची नस कापलेली असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमाही होत्या. सुरुवातीला हा संपूर्ण प्रकार सूसाइडचा असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात होता. मात्र अधिक तपास केल्यानंतर ही आत्महत्त्या की हत्या असा प्रश्न आता पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. सध्या पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या प्रतीक्षेत असून, बितास्ताचे फोन कॉल डिटेल तपासण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बितास्ता डिप्रेशनमध्ये होती. जेव्हा तिचे फेसबुक प्रोफाइल तपासण्यात आले तेव्हा तिने बºयाचशा डिप्रेस पोस्ट शेअर केल्याचे दिसून आले. एका पोस्टमध्ये तर तिने आयुष्य संपविण्याचाही उल्लेख केलेला होता. गेल्यावर्षी ९ डिसेंबर रोजी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ‘आयुष्य संपविणे चांगली बाब असते’ असे म्हटले होते. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. बितास्ताचा अखेरचा सिनेमा आॅक्टोबरमध्ये रिलिज झाला होता.