Join us

 एस्कॉर्ट सर्व्हिसच्या पोस्टरवर छापला अभिनेत्रीचा फोटो; पुढे जे झाले ते वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 13:25 IST

तू एस्कॉर्ट सर्व्हिस देतेस का? तुझे दर काय? अशा विचित्र प्रश्नांनी तिला भंडावून सोडले. आधी तिने या कॉलकडे दुर्लक्ष केले. पण सत्य जाणून घेतल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

ठळक मुद्देबंगाली चित्रपटसृष्टीत बृष्टी रॉय हे एक मोठे नाव आहे. बोउ कोथा काओ, तुमै अमै मिले, सुबर्णलता, भूमिकन्या अशा अनेक बंगाली मालिकांत तिने काम केले आहे.

बंगाली अभिनेत्री बृष्टी रॉय हिचे सध्या जगणे कठीण झाले आहे. होय, बृष्टीला गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण बंगालमधून कॉल येत आहेत. तू एस्कॉर्ट सर्व्हिस देतेस का? तुझे दर काय? अशा विचित्र प्रश्नांनी तिला भंडावून सोडले आहे. बृष्टीने आधी या कॉलकडे दुर्लक्ष केले. पण सत्य जाणून घेतल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कोलकात्याच्या लोकल ट्रेन आणि रेल्वे स्टेशनवर गेल्या 10 दिवसांपासून ठिकठिकाणी पोस्टर्स लागले होते. या पोस्टरवर बृष्टीला फोटो आणि मोबाईल नंबर छापण्यात आला होता आणि हे पोस्ट एस्कॉर्ट सर्व्हिस अर्थात कॉल गर्ल पुरवणा-या सर्व्हिसचे होते. हे पोस्टर ठिकठिकाणी लागलेत आणि बृष्टीला अश्लिल कॉल्स येऊ लागले.   सुरुवातीला तिला हे सगळे काय होतेय, याचा अंदाज आला नाही. पण यानंतर तिच्या एका मित्राने तिला या पोस्टरबद्दल सांगितले आणि बृष्टीला धक्का बसला.

आएएनएससोबत बोलताना तिने ही संपूर्ण आपबीती सांगितली. ‘ गत 24 ऑगस्टपासून अनोळखी नंबरवरून मला फोन येणे सुरु झाले. आधी हे कॉल स्पॅम कॉल असतील म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. काही फोन मी उचलले तेव्हा त्यांनी मला एस्कॉर्ट सर्व्हिससंदर्भात विचारणा केली. याचदरम्यान माझ्या एका मित्राने मला माझ्या पोस्टर संदर्भात सांगितले. या पोस्टरवर माझा फोटो आणि नंबर छापण्यात आला होता. त्या मित्राने मला संबंधित पोस्टरचा फोटो मला पाठवला. पोस्टर पाहून मला धक्काच बसला. फोन करणारे सर्व जण अश्लील भाषेत बोलत होते. मी लगेच पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सध्या पोलिस तपास सुरु असल्याने मी माझा नंबर बदलू शकत नाही. मी निर्दोष आहे, हे मला ठाऊक आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक मला त्रास देण्यासाठी हे सगळे केले आहे. पण मी अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही. मी इतक्या सहजपणे हार मानणार नाही, असे बृष्टी म्हणाली.

बंगाली चित्रपटसृष्टीत बृष्टी रॉय हे एक मोठे नाव आहे. बोउ कोथा काओ, तुमै अमै मिले, सुबर्णलता, भूमिकन्या अशा अनेक बंगाली मालिकांत तिने काम केले आहे. काही बंगाली चित्रपटांतही ती झळकली आहे.

टॅग्स :पश्चिम बंगाल