बेगम करिना कपूर खानच्या रेड गाऊनवर खिळल्या सर्वांच्या नजरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 14:42 IST
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध डिझाईनर मनीष मल्होत्रा याने काल मंगळवारी रात्री आपल्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडचे ...
बेगम करिना कपूर खानच्या रेड गाऊनवर खिळल्या सर्वांच्या नजरा!
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध डिझाईनर मनीष मल्होत्रा याने काल मंगळवारी रात्री आपल्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिसले. पण यावेळी सगळ्यांच्या नजरा कुणावर टिकल्या असतील तर त्या हॉट करिना कपूर खान हिच्यावर. या पार्टीत करिना तिची बेस्टी अमृता अरोरा हिच्यासोबत पोहोचली. बॅकलेस लेड गाऊनमध्ये करिना कमालीची हॉट दिसत होती. करिना पार्टीत पोहोचली तशा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. यापूर्वी करण जोहरच्या बर्थ डे पार्टीतही करिना बॅक लेस ड्रेसमध्ये दिसली होती. पण यावेळा करिनाचा अंदाज काही वेगळाच होता. तिला पाहून करिना लवकरच चित्रपटाचे शूटींग सुरु करणार, असे वाटत होते.करिनाचे काही हॉट फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो कसे वाटलेत, ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. ALSO READ : करिना कपूरने या कारणामुळे नाकारला शाहरूख खानचा चित्रपट!करिनासोबत मलायका अरोरा, कॅटरिना कैफ या दोघीही या पार्टीत दिसल्या. करिनाचा चुलत भाऊ रणबीर कपूर याच्यासोबत कॅटरिनाचे ब्रेकअप झाले आहे. या ब्रेकअपनंतर करिना व कॅटरिना प्रथमच आमने-सामने आल्या होत्या.मुलाच्या जन्मानंतर करिनाच्या बॉलिवूड वापसीची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. प्रेग्नंसीदरम्यान करिनाचे वजन खूप वाढले होते. गेल्या काही महिन्यांपासून करिना हे वजन कमी करण्यासाठी घाम गाळतेय. पण आता कदाचित करिना आपल्या परफेक्ट शेपमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे लवकरच करिना आपल्या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरु करेल, असे मानायला हरकत नाही. करिना ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.