Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेगम करिना कपूर खानला आता बनायचे आहे महाराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:09 IST

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर दिसणार आहे तर कंगना झाशीची राणी ...

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर दिसणार आहे तर कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात काम करते आहे. सानिया नेहवालच्या बायोपिकची ही तयारी सुरु आहे. नुकतेच एक इव्हेंट दरम्यान अभिनेत्री करिना कपूरने जयपूरची महाराणी गायत्री देवी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. गायत्री देवी यांचे आयुष खूप रोमांचकारी होते. लंडनमध्ये जन्मलेल्या गायत्री देवी यांचा जयपूरच्या महाराणी बनण्यापर्यंतचा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहाणे इंटरेस्टिंग असणार आहे.   गायत्री देवी यांचा जन्म 23 मे 1919 साली लंडनला झाला होता. त्या एक शानदार राजवाड्यात मोठ्या झाल्या होत्या जवळपास 500 नोकर त्यांच्याकडे कामाला होते असे बोलले जाते. प्रसिद्ध मॅगझिन वोगने गायत्री देवी यांना जगातील सगळ्यात सुंदर 10 महिलांच्या लिस्टमध्ये  स्थान दिले होते. त्या चांगल्या पोलो प्लेअर होत्या. त्यांना गाड्या आणि शिकारीची ही आवड होती. गायत्री देवी यांच्या आयुष्यातला पडताकाळ 29 जून 1970 पासून सुरू झाला ज्यावेळी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर 1997 साली लंडनमध्ये त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि 29 जुलै 2009 साली 90 व्या वर्षी त्यांनी देखील अखेरचा श्वास घेतला. ALSO READ :   ​कोणी अभिनेता नव्हे तर हा राजकारणी आवडायचा करिना कपूरलाकरिना सध्या तिच्या वीरे दी वेडिंग चित्रपटात बिझी आहे. वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात सोनम कपूरसह करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे.करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. या चित्रपटातून रिया ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करते आहे.