Join us

'मिली'च्या यशाआधी Janhvi Kapoorला लागली लॉटरी, वांद्र्यात घेतला इतक्या कोटींचा बंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 10:58 IST

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने मुंबईतल्या पॉश एरिया असलेल्या वांद्रे येथे तिचा नवीन डुप्लेक्स बंगला खरेदी केला आहे.

जान्हवी कपूर( Janhvi Kapoor)चा नवा चित्रपट 'मिली' (Mili) आज म्हणजेच ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवस अभिनेत्री सतत या चित्रपटाचे प्रमोशन करत होती. कपिल शर्माच्या कॉमेडी शोपासून ते माधुरी दीक्षितच्या डान्स रिअ‍ॅलिटी शो झलक दिखला जा पर्यंत जान्हवीने अनेक शोमध्ये हजेरी लावली आहे आणि सर्वांना तिचा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. पण चित्रपट हिट होण्याआधीच जान्हवीचे नशीब उजळताना दिसते आहे. नुकताच अभिनेत्रीने वांद्रे येथे कोट्यवधींचा नवीन बंगला खरेदी केला आहे.

जान्हवी कपूरने मुंबईतल्या पॉश एरिया असलेल्या वांद्रे येथे तिचा नवीन डुप्लेक्स बंगला खरेदी केला आहे. रिअल इस्टेट पोर्टल Indextap.com च्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचा हा डुप्लेक्स बंगला ६४२१ स्क्वेअर फूट कार्पेट एरियासह ८६६९ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. जान्हवी कपूरने आपल्या नवीन घराच्या रजिस्ट्रेशनचं काम १२ ऑक्टोबरला पूर्ण केले होते आणि फक्त रजिस्ट्रेशनसाठी तिने ३.९० कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीने वांद्रे येथील बंगल्यासाठी ६४ कोटी रुपये मोजले आहेत.

जुलैमध्ये विकलं होतं जुनं घरजान्हवी कपूरने यावर्षी जुलै महिन्यात तिचं जुनं घर विकलं होतं. जे ३४५६ स्क्वेअर फूटचं होतं. अभिनेत्रीचं हे घर मुंबईतील जुहू भागात आहे. हे घर तिने ४४ कोटी रुपयांना अभिनेता राजकुमार रावला विकले होते.

वर्कफ्रंटजान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर मिलीशिवाय अभिनेत्रीकडे बरेच चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. मिली व्यतिरिक्त तिच्याकडे  'मिस्टर एंड मिसेज माही' हा चित्रपट आहे. यात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. तसेच ती वरूण धवनसोबत बवाल चित्रपटात दिसणार आहे. याच्या शूटिंगला तिने सुरूवात केली आहे.

टॅग्स :जान्हवी कपूर