Join us

मृत्यूच्या आधी संजय कपूरने म्हटले होते फक्त हे ५ शब्द, हार्ट अटॅकच्या आधी घडलेलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:04 IST

Sunjay Kapur Death: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूरचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याने जगाचा निरोप घेतला.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर(Karisma Kapoor)चा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर(Sunjay Kapur)चे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याने जगाचा निरोप घेतला. संजयच्या मृत्यूची बातमी वेगाने पसरली, बॉलिवूडमधील अनेक स्टार्स करिश्मा कपूरच्या घरी पोहोचले होते. संजयच्या मृत्यूवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी शोक व्यक्त केला. एकीकडे त्याच्या जुन्या पोस्ट चर्चेत होत्या, तर दुसरीकडे हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी त्यांच्या तोंडात मधमाशी शिरल्याचे समोर आले.

एएनआयच्या रिपोर्ट्सनुसार, संजय कपूर पोलो खेळत असताना त्याच्या तोंडात एक मधमाशी गेली. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो अस्वस्थ झाला. गुदमरल्यानंतर संजय कपूरला हृदयविकाराचा झटका आला, काहीही करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आता आणखी एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये संजयने शेवटचे काय म्हटले हे उघड झाले आहे. द टेलिग्राफच्या रिपोर्ट्सनुसार, संजय कपूरच्या एका जवळच्या मित्राने संजय कपूरचे शेवटचे शब्द काय होते हे सांगितले आहे. पोलो सामन्यात उपस्थित असलेल्या लोकांनी संजय कपूरला 'मी काहीतरी गिळले आहे' असे म्हणताना ऐकले. ज्यामुळे त्यांना असे वाटले की पोलो खेळताना चुकून त्याच्या तोंडात किडा गेला आहे.

सुहेल सेठने संजयच्या मृत्यूची केली पुष्टी या प्रकरणाची पुष्टी संजयचा मित्र आणि व्यावसायिक सहकारी सुहेल सेठने केली. त्याने एएनआयला सांगितले की, 'इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान मधमाशी गिळल्यानंतर संजयचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

टॅग्स :करिश्मा कपूर