Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘भूतनी’ बनून मज्जा आली :उर्वशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 22:48 IST

‘ग्रेट ग्रॅड मस्ती’मधील हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल उर्वशी रौतेला हिला ‘भूतनी’ बनून मज्जा आली. होय, ‘ग्रेट ग्रॅड मस्ती’च्या प्रमोशनसाठी लोकमतच्या ...

‘ग्रेट ग्रॅड मस्ती’मधील हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल उर्वशी रौतेला हिला ‘भूतनी’ बनून मज्जा आली. होय, ‘ग्रेट ग्रॅड मस्ती’च्या प्रमोशनसाठी लोकमतच्या नागपूर कार्यालयात आली असता उर्वशीने स्वत:ची गोष्ट कबुल केली. ‘ग्रेट ग्रॅड मस्ती’मध्ये उर्वशी ‘वर्जिन घोस्ट’ म्हणजे भूतनी बनली आहे. ही भूमिका आॅफर झाली, तेव्हा तुझी पहिली रिअ‍ॅक्शन काय होती? असे विचारले असता ‘इंटरेस्टिंग’ असे उत्तर तिने दिले. हे कॅरेक्टर मला इंटरेस्टिंग वाटले आणि म्हणूनच मी या भूमिकेला होकार भरला. असे ती म्हणाली. ‘ग्रेट ग्रॅड मस्ती’मध्ये महिलांना बिर्यानी, लेग पीस, पाव आदी उपमा दिल्या आहेत. यामुळे सोसायटीत महिलांच्या इमेजला धक्का पोहोचेल, असे तुला वाटत नाही का? असे विचारले असता उर्वशीने काहीसे नकारात्मक उत्तर दिले. माझ्या मते, तुमचे संस्कार काय बोलतात, यावर सगळे अवलंबून आहे. महिलांचा आदर करावा, असे संस्कार तुमच्यावर झाले असतील तर महिलांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन नेहमीच आदरयुक्तच असेल. चित्रपट केवळ मनोरंजनासाठी असतो. आमचा चित्रपट अ‍ॅडल्ट कॉमेडी आहे. या चित्रपटात असे जोक्स वा द्विअर्थी संवाद चुकीचे म्हणता येणार नाही, असे उर्वशी म्हणाली......................................................................‘इट वॉज अ डेस्टिनेशन वेडिंग’‘ग्रेट ग्रॅड मस्ती’ची शूटींग माझ्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग होती. आफताब, रितेश व मी आम्ही शूटींग करताना धम्माल केली.  आमच्या तिघांच्या वाईफ, मुले आणि आम्ही शूटींगनंतर धम्माल केली. गप्पा, मस्ती, मज्जा यामुळे जणू एखाद्या लग्नसमारंभासाठी एकत्र जमलोय, असाच फिल आला. त्यामुळेच ‘ग्रेट ग्रॅड मस्ती’ची शूटींग म्हणजे आमच्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग होते, असे विवेक ओबेरॉय म्हणाला. रितेश, आफताब आणि मी आम्ही आता मित्र नाही एकमेकांचे भाऊ झालो आहोत.  परफॉर्मन्स इम्प्रुव्ह करण्यासाठी एकमेकांना सल्ले देताना आम्ही आता कचरत नाही, असेही विवेकने सांगितले.....................................................................आम्ही ‘मस्ती’ची सेन्चुरी बनवू‘ग्रेट ग्रॅड मस्ती’ हा ‘मस्ती’ फ्रेंचाइजीमधील तिसरा चित्रपट. यानंतर काय, असा सवाल केला असता मस्ती आणि मस्ती...असे उत्तर आफताब शिवदासानी याने दिले. आम्हाला तर  ‘मस्ती’ची सेन्चुरी करायला आवडेल. १२ वर्षे, ११२ वर्षे आम्ही ‘मस्ती’ करू. शेवटी आयुष्य म्हणजे काय तर मस्ती आणि मस्तीच आहे, हे सांगायलाही तो विसरला नाही.