Join us  

​या कारणामुळे सलमान खान नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या पार्टीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2017 11:38 AM

नवाझुद्दीन सिद्दीकीने त्याच्या मेहनतीच्या बऴावर आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव ...

नवाझुद्दीन सिद्दीकीने त्याच्या मेहनतीच्या बऴावर आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे.नवाझुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर त्याला सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकाराव्या लागल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो छोट्याशा भूमिकांमध्ये झळकलेला आहे. ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खरी दिशा मिळाली. आज नवाझुद्दीनने आमिर खानसोबत तलाशमध्ये तर शाहरुख खानसोबत रईसमध्ये काम केले आहे. सलमान खानसोबत तर तो किक आणि बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटात झळकला आहे. सलमान आणि नवाझुद्दीन यांची खूप चांगली मैत्री असली तरी सलमान नवाझुद्दीनला त्याच्या घरच्या पार्टींमध्ये बोलवत नाही. यामागे एक खास कारण आहे. सुरुवातीला सलमान त्याला सगळ्या पार्टींमध्ये बोलावत असे. पण नवाझुद्दीनला कोणत्याही पार्टींमध्ये जायला आवडत नाही. सलमानच्या मैत्रीखातर तो आवर्जून त्याच्या पार्टीला जात असे. पण तिथे तो एकदम शांत एकटाच बसत असे. नवाझुद्दीन पार्टींमध्ये कर्म्फटेबल नसतो हे सलमानच्या लक्षात आल्यावर सलमानने त्याला निमंत्रण देणे आता बंदच केले आहे.