बेबो म्हणते,‘डिप्पी-सैफ शेअर ग्रेट केमिस्ट्री’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 22:37 IST
बेगम करिना कपूर खान ही इंडस्ट्रीत तिच्या धडाकेबाज वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिला असे वाटते की, ‘नवाब आॅफ पतौडी’ सैफ ...
बेबो म्हणते,‘डिप्पी-सैफ शेअर ग्रेट केमिस्ट्री’
बेगम करिना कपूर खान ही इंडस्ट्रीत तिच्या धडाकेबाज वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिला असे वाटते की, ‘नवाब आॅफ पतौडी’ सैफ अली खान आणि दीपिका पदुकोन यांची केमिस्ट्री फार उत्तम आहे.’ एका मुलाखतीदरम्यान बोलताना बेबोला विचारण्यात आले की,‘ कोणासोबत सैफची चांगली केमिस्ट्री आहे? तेव्हा ती म्हणते,‘ओमकारा’ अभिनेत्री आणि ‘बाजीराव मस्तानी’ अभिनेत्री यांच्यासोबत सैफची केमिस्ट्री चांगली दिसते. त्यांच्या केमिस्ट्रीची जादू ‘लव्ह आज कल’ आणि ‘कॉकटेल’मध्ये पहावयास मिळाली. ‘रिअल लाईफ केमिस्ट्री पडद्यावर दिसलीच पाहिजे असे काही नाही. आणि पडद्यावरची केमिस्ट्री रिअल लाईफमध्येही दिसेलच असे काही नक्की नसते. आपण कलाकार म्हणून दिवसाच्या शेवटपर्यंत काम करत असतो. जेव्हा तिला विचारण्यात आले की, तिचा एक्स-बॉयफें्रड शाहीद कपूर सोबत तिची केमिस्ट्री कशी वाटते? तर ती म्हणते,‘सुपर हॉट’! बेबो आगामी तिच्या ‘की अॅण्ड का’ चित्रपटामध्ये करिअर ओरिएंटेड महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे.