Join us

KGF फेम यशसोबत झळकणार बॉलिवूडची बेबो! या सिनेमातून करीना कपूर करणार साऊथमध्ये डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:45 IST

Kareena Kapoor And Yash : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. दरम्यान, करीना लवकरच साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार असल्याची बातमी समोर आली आहे. KGF स्टार यशच्या पुढील सिनेमात करीना कपूर खान दिसणार असल्याचे बोलले जात आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री आता साऊथ इंडस्ट्रीकडे वळत आहेत. त्याचबरोबर दक्षिणेतील सौंदर्यवतीही बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपला इंटरेस्ट दाखवत आहेत. दरम्यान, करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)ही तिच्या साऊथ डेब्यूसाठी सज्ज असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी तिने ओटीटीवर पदार्पण केले. नवीन वर्षात, ती काहीतरी नवीन करताना आणि KGF स्टार यश(Yash)सोबत त्याच्या नवीन सिनेमात काम करताना दिसणार आहे.

करीना कपूर खान दाक्षिणात्य अभिनेता यशच्या टॉक्सिक या चित्रपटात काम करणार असल्याचे बोलले जात आहे. यशने गेल्या वर्षी त्याच्या चित्रपटाची घोषणा केली होती आणि डिसेंबरमध्ये चित्रपटाचे नाव जाहीर केले होते. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. निर्मात्यांना अद्याप चित्रपटाची माहिती उघड करायची नाही. जर हे वृत्त खरे ठरले तर करिनाचे हे कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण असेल.

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक गीतू मोहनदास आणि यश येत्या काही दिवसांत करीनाच्या स्टार कास्टमध्ये सामील होण्याची घोषणा करू शकतात. काही आठवड्यांत चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, करिनाच्या आधी रवीना टंडनही यशसोबत KGF 2 मध्ये दिसली होती. यशचा हा १९ वा चित्रपट आहे. अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या चित्रपटाची घोषणा केली होती.

करीना कपूर वर्कफ्रंट

करीना कपूरने गेल्या वर्षी ओटीटीवर पदार्पण केले होते. तिचा जाने जान हा चित्रपट लोकांना खूप आवडला. करिनाचे ओटीटी पदार्पण धमाकेदार होते. आता ही अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीत आपली छाप सोडण्यास तयार असल्याचे मानले जात आहे. करीना कपूर या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :करिना कपूरयश