Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्युटी इन व्हाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 15:36 IST

एखाद्या रंगाचा, एखाद्या स्टाईलचा ट्रेंड आला की, तोच काही दिवसांसाठी तरी पाहायला मिळतो. सध्या पांढऱ्या कपड्यांचा ट्रेंड बॉलिवुड अभिनेत्री ...

एखाद्या रंगाचा, एखाद्या स्टाईलचा ट्रेंड आला की, तोच काही दिवसांसाठी तरी पाहायला मिळतो. सध्या पांढऱ्या कपड्यांचा ट्रेंड बॉलिवुड अभिनेत्री आणि छोट्‌या पडद्यावरील कलाकारांमध्ये दिसून येत आहे. अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या ठिकाणी पांढऱ्या कपड्यांमध्ये वावरताना पाहायला मिळत आहेत. काहीजण प्लेन पांढऱया कपड्यांना पसंती देत आहेत तर काहींच्या पांढऱ्या कपड्यांवर डिझाईन पाहायला मिळतेय. या कपड्यांची शोभा वाढवण्यासाठी त्यावर साजेसे असे नेकलेलही या अभिनेत्री घालताना आपल्याला दिसत आहेत. 
अभिनेत्री स्वरा भास्करने निल बट्टे सन्नाटा या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्यावेळी पांढरा वनपीस आणि त्यावर खूप छान नेकलेस घातला होता. तर दिया मिर्झा एका कार्यक्रमासाठी पांढरा वनपीस घालून आली होती. पांढरा वनपीस आणि लाल नेकलेसमध्ये ती खूपच छान दिसत होती. तसेच राजेश्वरी सचदेवने व्हाईट साडीवर अॅक्सेसरीज घालताना नेकलेस न घालता केवळ मोठाले कानातले घातले होते. हा लूक सोबर असला तरी उठून दिसत होता. कल्की कोचेनने एका चित्रपटाच्या प्रिमियरला घातलेला पांढऱ्या रंगाचा फ्रिल कटचा स्कर्ट तिच्यावर खूपच शोभून दिसत होता. तर कंगनाने साधा व्हाईट शर्ट-पँट घातला असला तरी तो खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हुमा कुरेशीचा व्हाईट ड्रेस आणि त्यावरील कानातले हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यातही हाच ट्रेंड पाहायला मिळला. अभिनेत्री बरखा सेनगुप्ता आणि मल्लाईका खानही पांढऱ्या कपड्यात पुरस्कार सोहळ्याला आल्या होत्या. या पांढऱ्या कपड्यांमुळे त्यांच्या सौंदर्याला नक्कीच चार चाँद लागले.