Join us
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्याने खास व्यक्तिसोबत साजरा केला वाढदिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 22:21 IST

मेगास्टार रजनीकांतची लाडकी लेक सौंदर्या रजनीकांत हिचा काल वाढदिवस झाला. सौंदर्याच्या खासगी आयुष्यात सगळे काही आॅल वेल नसले तरी ...

मेगास्टार रजनीकांतची लाडकी लेक सौंदर्या रजनीकांत हिचा काल वाढदिवस झाला. सौंदर्याच्या खासगी आयुष्यात सगळे काही आॅल वेल नसले तरी तिने कालचा वाढदिवस धम्माल मस्ती करत साजरा केला. तेही एका विशेष व्यक्तीसोबत. या व्यक्तिसोबत सेलिब्रेशन म्हटल्यावर निश्चितपणे सौंदर्याला दुसºया कुणाचीही गरज भासली नाही. ही व्यक्ति म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून सौंदर्याची बहीण. होय, आम्ही बोलतोय ते ऐश्वर्या आर धनुषबद्दल. कालचा वाढदिवस सौंदर्याने ऐश्वर्यासोबत साजरा केला. या सेलिब्रेशनचा एक फोटो सौंदर्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  सौंदर्या व तिचा पती अश्विन रामकुमार यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून मीडियात सुरु होती. सौंदर्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचीही माहिती होती. सौंदर्याने अलीकडे या वृत्ताला दुजोरा दिला.  ‘माझ्या लग्नाबाबत सुरु असलेली चर्चा खरी आहे. आम्ही दोघे गत वर्षभरापासून वेगळे राहत आहोत आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. यास्थितीत माझ्या खासगी आयुष्याचा सन्मान व्हावा, अशी माझी विनंती आहे,’असे tweet सौंदर्याने केले होते.