Join us  

‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 2:45 PM

अशा काही अभिनेत्र्या आहेत ज्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये सातत्याने रंगताना दिसते. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींबाबत...

ठळक मुद्देबॉलिवूड आणि सौंदर्य जणू समिकरणच आहे.काही अभिनेत्रींच्या सौंदर्याच्या चर्चा नेहमीच रंगतात.सौंदर्य टिकविण्यासाठी अभिनेत्री घेतात प्रचंड मेहनत

-रवींद्र मोरेबॉलिवूड आणि सौंदर्य जणू समिकरणच आहे. याठिकाणी प्रत्येक अभिनेत्री ही सौंदर्याचा खजिना आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. चित्रपटात आपले अभिनय कौशल्य दाखविल्यानंतर अभिनेत्रींचे तसे कौतुकच होते, मात्र अशा काही अभिनेत्र्या आहेत ज्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये सातत्याने रंगताना दिसते. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींबाबत...* उर्वशी रौतेला

उर्वशीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग विश्वातून केली असून कालांतराने ती अभिनय क्षेत्राकडे वळली. तिच्या अभिनयाबरोबरच ती आपल्या सौंदर्याने खूपच प्रसिद्धी झाली. उर्वशी रौतेला चित्रपट जगातील एक अतिशय सुंदर अभिनेत्री तिच्या सौंदर्याने अनेकांना वेड लावले आहे.* काजल अग्रवाल

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालचेही सौंदर्य वाखाण्याजोगे आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात तमिळ चित्रपटांमधून केली असून नंतर ती मल्याळम चित्रपटांमध्ये काम करु लागली. शिवाय तिने हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.* तमन्ना भाटिया

अनेक हिट चित्रपट देत दाक्षिणात्य चित्रपटात नावारुपाला आलेली तमन्ना भाटिया ही एक अतिशय सुंदर आणि आकर्षक अभिनेत्री आहे. तमन्नाने बाहुबलीसारख्या मोठ्या चित्रपटातही असून तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.* हंसिका मोटवानी

हंसिका देखील खूपच सुंदर आहे. हंसिकाने बॉलिवूडमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती, मात्र तिला याठिकाणी अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटात नशिब आजमावले. सध्या ती तामिळ मल्याळम तेलगू इत्यादी भाषांमध्ये काम करते. हंसिका मोटवानी सौंदर्याच्या बाबतीत इतरांपेक्षा कमी नाही.* कीर्ती सुरेश

आपल्या सौंदर्याने नेहमी चर्चेत कीर्ती सुरेशने असंख्य चित्रपटात काम केले आहे. पैकी तिने बरेच हिट चित्रपटही दिले आहेत. महानती चित्रपटात सावित्री साकारल्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. ती बहुतांश तामिळ आणि मल्याळम भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसते.

टॅग्स :बॉलिवूडउर्वशी रौतेलाकाजल अग्रवालतमन्ना भाटियाहंसिका मोटवानी