राष्ट्रपती व्हायचेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:49 IST
बॉलीवूडमधील केवळ शोभेची बाहुली म्हणून टीका सहन करणारी कॅटरिना कैफ ला म्हणे राष्ट्रपती व्हायचे आहे. तशी तिची ‘फितूर’ (तिव्र ...
राष्ट्रपती व्हायचेय...
बॉलीवूडमधील केवळ शोभेची बाहुली म्हणून टीका सहन करणारी कॅटरिना कैफ ला म्हणे राष्ट्रपती व्हायचे आहे. तशी तिची ‘फितूर’ (तिव्र इच्छा) असल्याचे ती म्हणते. मागील काही वर्षांत कॅटने चांगलीच प्रगती केली आहे, हे विशेष. केवळ मोठ्या स्टार्ससोबत काम करणारी अभिनेत्री, असा शिक्का तिच्यावर मारण्यात आला होता. आता मात्र तिला केंद्रस्थानी ठेऊन भूमिका लिहिण्यात येत आहेत. कॅटला या सर्व गोष्टींची जाणीव आहे. ‘मी अनेकांच्या कठीण टीका सहन केल्या आहेत. चुकांमधून शिकत गेले. प्रगाढ इच्छाशक्तीच्या जोरावर मी इथवर पोहोचू शकले,’ असे ती म्हणते.कॅटच्या आगामी ‘फितूर’ या आगामी चित्रपटाबाबत तिला प्रचंड उत्सुकता आहे. ‘फितूर’ म्हणजे तीव्र इच्छा. हा चित्रपट चार्ल्स डिकेन्सच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स’वर आधारित आहे. येत्या शुक्रवारी रिलीज होणारा हा चित्रपट अलीकडील महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक आहे.एका टीव्ही शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली असता कॅटने आपल्याला भारताचे राष्ट्रपती व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली.