Join us

दोन लहानग्यांच्या भावविश्वाची लढाई ‘धनक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 09:00 IST

 दिग्दर्शक नागेश कुकनूर्स यांच्या ‘धनक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला 

 दिग्दर्शक नागेश कुकनूर्स यांच्या ‘धनक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच चित्रपट रसिकांचे डोळे याकडे वळले. इंडस्ट्रीत चित्रपटातील कथानक आणि दोन लहान मुलांचे भावनिक विश्व याविषयी चर्चा सुरू झाली.‘डोर’ आणि ‘इकबाल’ या दोन चित्रपटानंतर आता ‘धनक’ कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एक अंध मुलगा आणि त्याला दृष्टी देण्यासाठी झगडणारी त्याची बहीण यांची ही कथा आहे. राजस्थानातील हे बहीण-भाऊ डोळयाचे आॅपरेशन करण्यासाठी काय काय करतात याची कथा यात दाखवण्यात आली आहे.तो मुलगा आठ वर्षांचा असतो आणि त्याच्या बहीणीने त्याला ९ व्या वर्षी दृष्टी मिळवून देण्याचे प्रॉमीस केलेले असते. यात क्रिश छाबडिया आणि हेतल गाडा हे दोघे बहीण-भावाच्या भूमिकेत दिसतील.">http://