सलमान-ऋतिकला एकत्र आणणार बडजात्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 06:10 IST
‘प्रेम रतन धन पायो’ बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरल्यानंतर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या आणखी एक चित्रपट घेऊन येत आहेत. ...
सलमान-ऋतिकला एकत्र आणणार बडजात्या
‘प्रेम रतन धन पायो’ बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरल्यानंतर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या आणखी एक चित्रपट घेऊन येत आहेत. निश्चितपणे या चित्रपटातही बडजात्या यांचा आॅल टाईम फेवरेट सलमान खान हाच भूमिका साकारताना दिसतान असून त्याच्यासोबत मॅचोमॅन ऋतिक रोशन हाही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. नवीन कथेवर माझे काम सुरु आहे. निश्चितपणे यात सलमान असणार, असे सूरज बडजात्या यांनी सांगितले. बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’, ‘हम साथ साथ है’ आणि अलीकडे प्रदर्शिक ‘पे्रम रतन धन पायो’ चित्रपटात सलमान झळकला आहे. ऋतिकसोबत बडजात्या यांनी ‘मै प्रेम की दीवानी हूं’ चित्रपट बनवला होता. अर्थात बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फेल ठरला होता.