Join us

प्रमोशनसाठी मुलांचे फोटो वापरल्याने हृतिक रोशन ‘या’ ब्रॅण्डवर बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 18:47 IST

अभिनेता हृतिक रोशन हा जेवढा त्याच्या डान्ससाठी ओळखला जातो तेवढाच तो त्याच्या शांत स्वभावासाठीदेखील ओळखला जातो. मध्यंतरीच्या काळात त्याच्या ...

अभिनेता हृतिक रोशन हा जेवढा त्याच्या डान्ससाठी ओळखला जातो तेवढाच तो त्याच्या शांत स्वभावासाठीदेखील ओळखला जातो. मध्यंतरीच्या काळात त्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक कठीण प्रसंग आलेत, मात्र त्याने संयमाने त्याचा सामना केला. परंतु जेव्हा त्याच्या मुलांचा विषय आला तेव्हा मात्र त्यांच्या संतापाचा पारा चढला. तो स्वत:वर अजिबात नियंत्रण ठेवू शकला नाही. आपल्या संतापाला वाट मोकळी सोडत समोरच्यावर तो असा काही बरसला की त्याची बोलतीच बंद झाली. }}}} त्याचे झाले असे की, क्लोदिंग ब्रॅण्ड टॉमी हिलफिगरने त्याच्या एक्सक्लूझिव्ह सेलच्या प्रमोशनसाठी हृतिक आणि त्याच्या रिहान आणि रिदान या दोन मुलांचे फोटो वापरले. मात्र याबाबतची कल्पना हृतिकला नव्हती. जेव्हा त्याला ही बाब कळाली तेव्हा मात्र त्याच्या संतापला पारावार उरला नाही. त्याने ट्विटर हॅण्डलवर ब्रॅण्डमध्ये वापरलेल्या त्याचा आणि त्याच्या मुलांचा फोटो शेअर करीत टॉमी हिलफिगरला खडे बोल सुनावले. हृतिकने लिहिले की, ‘डियर टॉमी, मी आणि माझे दोन्ही मुले तुझ्या ब्रॅण्डचे कपडे परिधान करीत नाही. अशाच तू तुझ्या ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी आमचे फोटो का वापरलेत. जर तुझं डोकं जागेवर नसेल तर माझ्याकडे एक भली मोठी टीम आहे, जी तुला मदत करू शकेल. त्यामुळे अपेक्षा करतो की, तूच तुझी मदत करावी’ हृतिकच्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली असली तरी त्याच्या फॅन्सला मात्र हृतिकचा हा अंदाज खूपच भावला आहे. या ब्रॅण्डने वापरलेला फोटो हा हृतिकनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. खरं तर हृतिक नेहमीच त्याच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असतो. २००० मध्ये सुजान खान हिच्याबरोबर विवाह झालेल्या हृतिकने २०१४ मध्ये तिच्याशी घटस्फोट घेतला होता. मात्र मुलांमुळे हे दोघेही नेहमीच एकत्र बघावयास मिळाले आहेत. नुकताच हा परिवार नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दुबई येथे गेला होता. ज्याठिकाणी हृतिक मुलांसोबत धमाल करताना बघावयास मिळाले. त्याबाबतचे काही फोटोही त्याने शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच रिलिज झालेल्या हृतिकच्या ‘काबिल’ने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला. यामी गौतम हिच्यासोबत त्यांने अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. समीक्षकांनी हृतिकच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुकही केले होते. त्यामुळे हृतिक आनंदात होता. मात्र टॉमी ब्रॅण्डने त्याच्या या आनंदावर पूर्णत: पाणी फेरले आहे. आता हृतिकच्या या ट्विटला ब्रॅण्डकडून नेमके कशा पद्धतीने उत्तर दिले जाईल हे बघणे मजेशीर ठरेल.