ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली राजकीय कुटुंबांपैकी एक आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. गाजावाजा न करता, फक्त तळमळीने आणि मेहनतीने त्याने आपली वाट बनवायला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप(Anurag Kashyap)च्या आगामी सिनेमात तो काम करताना दिसणार आहे.
राजकीय वारशातून आलेल्या कुटुंबातील सदस्य असूनही, ऐश्वर्य ठाकरेने पारंपरिक राजकारणाचा मार्ग स्वीकारला नाही. त्याने सिनेमाची निवड केली. २०१५ साली संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. या अनुभवातून त्याला चित्रपट निर्मितीबद्दल समजले. मायकेल जॅक्सनचा मोठा चाहता असलेला ऐश्वर्यची नृत्यातील आत्मविश्वास आणि रंगमंचावरील उपस्थिती लक्षणीय आहे. त्याची रिहर्सल्स पाहिलेल्यांचे म्हणणे आहे की तो उत्तम डान्सर आहे.
ऐश्वर्य लाइमलाइटपासून राहतो दूरआजच्या काळात प्रसिद्धी आणि सोशल मीडियाची सत्ता असताना, ऐश्वर्यने प्रसिद्धीपासून दूर राहून स्वतःच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. अभिनेता व निर्माता निखिल द्विवेदीने एकदा म्हटले होते, “तो नक्की लक्ष ठेवण्यासारखा आहे.” ही टिप्पणी त्या वेळी साधी वाटली असली, तरी आज ती त्यांच्या क्षमता ओळखणारी दूरदृष्टी ठरते आहे. अनुराग कश्यप यांच्यासारख्या गंभीर आणि सखोल विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शकासोबत तो दमदार पदार्पण करतो आहे. कोणत्याही मोठ्या प्रमोशनल मोहिमेशिवाय, ऐश्वर्य आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत.