Join us  

'व्हॉट झुमका' गाण्यावर हर्षालीचा भन्नाट डान्स; 'मुन्नी'चे ट्रांसफॉर्मेशनपाहून चकीत व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 7:42 PM

'बजरंगी भाईजान' चित्रपटातील 'मुन्नी' म्हणजेच हर्षाली मल्होत्राने 'Rocky Aur Rani Kii Prem Kahaani' च्या गाण्यावर डान्स केला आहे.

Harshali Malhotra Dance: सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी ​​आठवते? 2015 मध्ये आलेल्या या चित्रपटात सलमान मुन्नीला पाकिस्तानला सोडायला जातो. चित्रपटात अतिशल लहान आणि गोंडस दिसणारी मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) ​​आता मोठी झाली असून, सोशल मीडिया स्टार बनली आहे. ती अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ आणि रील इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. हर्षालीने नुकताच 'व्हॉट झुमका'वर डान्सचा व्हिडिओ शअर केला आहे. 

हर्षाली मल्होत्राने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील 'व्हॉट झुमका' गाण्यावर रेड कलरच्या लेहेंग्यात अप्रतिम डान्स केला असून, यात तिचे एक्सप्रेशनही कमाल दिसतात. इंस्टाग्रामवर हर्षालीचा मोठा चाहतावर्ग आहे, ज्यांना हा व्हिडिओ खूप आवडतोय. या व्हिडिओत तिने फक्त अप्रतिम डान्सच केला नसून, ती खूप सुंदरही दिसत आहे. चाहते तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चकीत झाले आहेत.

5000 मुलांमधून हर्षालीची निवड 'बजरंगी भाईजान'च्या वेळी हर्षाली मल्होत्रा ​​अवघ्या 6 वर्षांची होती, तिने तिच्या निरागस अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. जेव्हा तिने चित्रपटात 'मामा' हा शब्द उच्चारला तेव्हा प्रत्येक प्रेक्षक रडला. 'बजरंगी भाईजान' हा हर्षाली मल्होत्राचा पहिला चित्रपट होता, मात्र याआधी तिने काही जाहिरातींमध्ये काम केले होते. 5000 मुलींच्या ऑडिशनमधून या चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेसाठी हर्षाली मल्होत्राची निवड करण्यात आली होती.

टॅग्स :बॉलिवूडइन्स्टाग्रामसोशल व्हायरलसोशल मीडियासलमान खान