Join us

बाजीराव मस्तानीचा 'डबस्मॅश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:19 IST

बॉलिवूडमध्ये खोडकर अभिनेत्यांची नावे सांगावयाची झाल्यास त्यामध्ये रणवीर सिंगचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. नेहमीच आपल्या सहकालाकाराची खोड काढण्यात पटाईत ...

बॉलिवूडमध्ये खोडकर अभिनेत्यांची नावे सांगावयाची झाल्यास त्यामध्ये रणवीर सिंगचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. नेहमीच आपल्या सहकालाकाराची खोड काढण्यात पटाईत असलेल्या रणवीरने बीग बी अमिताभ बच्चनसोबत चांगलीच धमाल केली. ते दोघेही नुकतेच 'आज की रात है जिंदगी' या मालिकेच्या सेटवर एकत्र आले होते. खरं तर आजपर्यंत दोघांनी एकाही चित्रपटात काम केले नाही. मात्र त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाची यावेळी प्रेक्षकांना चांगलीच प्रचिती आली. रणवीर त्याच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तेथे आला होता. यावेळी बीग बीने रणवीरसोबत चित्रपटाबाबत चर्चा करताना चांगलीच धमाल केली. या चर्चेतून त्यांनी एक 'डबस्मॅश' बनविला.