'बाजीराव मस्तानी' मैलाचा दगड - पिगी चॉप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:38 IST
'क्वां टीको'च्या जबरदस्त यशामुळे चर्चेत असणारी प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा 'बाजीराव मस्तानी' च्या ...
'बाजीराव मस्तानी' मैलाचा दगड - पिगी चॉप्स
'क्वां टीको'च्या जबरदस्त यशामुळे चर्चेत असणारी प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा 'बाजीराव मस्तानी' च्या राहिलेल्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. कुठलीही भूमिका करताना त्यासाठी संपूर्ण तन मन धन अपूर्ण काम करणे हे प्रियांकाचे वैशिष्टय आहे. संजय लीळा भन्साळींच्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये म्हणजेच 'बाजीराव मस्तानी' मध्ये ३३ वर्षीय प्रियांका ग्रेट मराठा योद्धा बाजीराव यांच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच काशीबाईंची भूमिका साकारत आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली, 'हा चित्रपट माझ्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरणार आहे. मला या प्रोजेक्टचा हिस्सा बनवल्यामुळे मी संजयची आभारी आहे.' प्रियांकाने सेटवरचे काही फोटोजही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रणवीर सिंग आणि दिपिका पदुकोन यांच्याही महत्त्वपुर्ण भूमिका असणार्या या चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत.