Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बागी २’ ची शांघायमध्ये होणार शूटिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 12:54 IST

साजिद नादियाडवाला निर्मित आणि श्रद्धा कपूर - टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिकेतील ‘बागी’ चित्रपट हिट ठरला आहे. त्याचे यश ...

साजिद नादियाडवाला निर्मित आणि श्रद्धा कपूर - टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिकेतील ‘बागी’ चित्रपट हिट ठरला आहे. त्याचे यश पाहून चीनच्या सरकारने टायगर-श्रद्धा यांना त्यांच्या देशात शूटिंगसाठी आमंत्रण दिले आहे.याविषयी बोलताना साजिद म्हणाले,‘ हो..हे खरे आहे. दिग्दर्शक साबिर खान, टायगर आणि श्रद्धा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. आम्ही आता २०१७ मध्ये ‘बाघी २’ काढण्याचा विचार करतोय.’अफवा तर अशीही आहे की, चीनमधील तज्ञ मार्शल आर्ट ट्रेनर्सकडून टायगर ट्रेनिंगही घेतो आहे. टायगर म्हणतो, ‘साजिद सर हे बेस्ट गुरू आहेत. मी सिक्वेलमध्ये काम करण्याचा विचार करतोय.’