Join us

‘बाहुबली’ सिक्वेलमध्ये असा असेल तमन्नाचा रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 13:46 IST

'बाहुबली' सिनेमाचा सिक्वेल बाहुबली-2साठी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या बराच घाम गाळतेय. तमन्नाच्या भूमिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. या भूमिकेसाठी सध्या तमन्ना ...

'बाहुबली' सिनेमाचा सिक्वेल बाहुबली-2साठी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या बराच घाम गाळतेय. तमन्नाच्या भूमिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. या भूमिकेसाठी सध्या तमन्ना घोडेस्वारी शिकतेय. घोडेस्वारी शिकण्याचा तिचा हा पहिलाच प्रयत्न आहे.. घोड्याची लय पकडणं आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यावर सध्या ती मेहनत घेतेय. बाहुबलीच्या सिक्वेलमध्ये तमन्ना एक्शन करताना दिसणार आहे. ज्यात तिला तलवारबाजी आणि घोडेस्वारीही करावी लागणार आहे. बाहुबली हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला होता. त्यातच कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं रहस्यही सिक्वेलमधून उलडणार असल्यानं रसिकांकडून बाहुबली-2 ची प्रतिक्षा सुरु आहे.