Join us

‘बाहुबली’ प्रभासने ‘हे’ काय वक्तव्य केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 14:40 IST

तब्बल १६०० कोटींची कमाई करून भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिणाºया ‘बाहुबली-२’च्या प्रभासने एक वक्तव्य करून खळबळ उडवून ...

तब्बल १६०० कोटींची कमाई करून भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिणाºया ‘बाहुबली-२’च्या प्रभासने एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटात मिळालेल्या अफाट यशाने सध्या भारावून गेला असून, आपल्या भावना नेमक्या कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त कराव्यात, अशी अवस्था सध्या प्रभासची झाली आहे. प्रभासने नुकतेच एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, ‘मी एवढे चांगले काम करू शकतो, हे मलादेखील माहिती नव्हते.’ आता प्रभासचे हे वक्तव्य अनेकांना चकित करणारे ठरत आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे की, प्रभासने या प्रोजेक्टसाठी त्याच्या करिअरमधील पाच वर्षे दिले आहेत. या कालावधीत त्याने केवळ ‘बाहुबली-२’वरच फोकस केले  होते. यादरम्यान त्याला बºयाचशा आॅफर्स आल्या होत्या; मात्र त्या त्याने सपशेल नाकारल्या. यामुळे त्याला आर्थिक चणचणदेखील भासली. मात्र अशातही प्रभासने पूर्ण लक्ष केवळ ‘बाहुबली’ प्रोजेक्टवरच केंद्रित केले होते. याविषयी प्रभासने नुकतीच आपल्या भावनांना वाट मोकळी केली. त्याने म्हटले की, मी एवढे चांगले काम करू शकतो, हे मलादेखील माहिती नव्हते. परंतु अशातही दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी माझ्यावर विश्वास टाकला. ‘बाहुबली’ची भूमिका मिळणे माझ्यासाठी सन्मान आहे. त्यामुळे पाच वर्षच नव्हे तर सात वर्ष मी बाहुबलीसाठी देण्यास तयार होतो. मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो की, मला ‘बाहुबली’ची भूमिका साकारायला मिळाली. आयएएनएस एजन्सीबरोबर बोलताना त्याने वरील वक्तव्य केले. या चित्रपटासाठी प्रत्येकानेच अथक परिश्रम घेतले आहेत. याविषयी बोलताना प्रभासने म्हटले की, बाहुबली बनण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या चित्रपटामुळे माझे संपूर्ण लाइफस्टाइलच बदलून गेली. मला एकदम स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करावे लागत होते. प्रभासने ‘बाहुबली’मध्ये वडील आणि मुलाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात अ‍ॅक्टिंग करण्याविषयी प्रभासने म्हटले की, ‘मला माहीत नव्हते की, मी चित्रपटांमध्ये अ‍ॅक्टिंग करू शकणार, कारण मी खूपच लाजाळू आहे. वयाच्या १८ व्या वर्षी मला जाणीव झाली की, मी अ‍ॅक्टिंग करू शकतो. जेव्हा याविषयी मी माझ्या वडिलांना सांगितले तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला होता. ‘बाहुबली’ने मला सर्वकाही दिले. जे मी शब्दात सांगूच शकत नाही. ‘बाहुबली-२’ची झिंग अजूनही प्रेक्षकांवर कायम आहे. देशातील काही भागांमध्ये अजूनही हा चित्रपट हाउसफुल या बॅनरअंतर्गत झळकत आहे. प्रभास ‘बाहुबली’नंतर ‘साहो’ या प्रोजेक्टवर सध्या काम करीत आहे. या चित्रपटात त्याच्या अपोझिट कोण असेल यावरून सध्या कॅटरिनापासून ते अनुष्का शेट्टी या अभिनेत्रींच्या नावांची सध्या जोरदार चर्चा आहे.