Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘बाहुबली’ प्रभासने चाहत्यांना दिली वाढदिवसाची भेट; ‘साहो’चे फर्स्ट लूक जारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 10:37 IST

‘बाहुबली’ सीरिजच्या अभूतपूर्व यशानंतर सुपरस्टार प्रभास पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावणार हे नक्की. विश्वास बसत नसेल तर प्रभासच्या बहुप्रतिक्षीत ...

‘बाहुबली’ सीरिजच्या अभूतपूर्व यशानंतर सुपरस्टार प्रभास पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावणार हे नक्की. विश्वास बसत नसेल तर प्रभासच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे हे पहिले पोस्टर तुम्ही बघायलाच हवे. आम्ही कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, आम्ही बोलतोय ते प्रभासच्या ‘साहो’ या आगामी चित्रपटाबद्दल. आज (२३ आॅक्टोबर) प्रभासचा वाढदिवस. प्रभासच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून आज ‘साहो’चे फर्स्ट लूक जारी करण्यात आले आहे.  या पोस्टरमध्ये प्रभास सूटाबुटात दिसतोय. अंधारलेली धुक्यांची चादर वेढलेली रात्र आणि धुक्यातून एकटा चालत येणारा,चेहरा झाकलेला प्रभास असे हे पोस्टर कमालीचे इंटरेस्टिंग आहे. हे पोस्टर तुमची उत्सुकता शिगेला पोहोचवणार, एवढेच आम्ही तुम्हाला सांगू शकतो.सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’ पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची वर्णी लागली आहे. चित्रपटात ती डबलरोल साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धा प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे. चर्चा खरी मानाल तर, यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात श्रद्धा ‘साहो’मध्ये दिसणार आहे. यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. श्रद्धाशिवाय नितीन मुकेश, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ आणि चंकी पांडे यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.सूत्रांचे खरे मानाल तर, ‘साहो’ हा स्वातंत्र्याचीपूवीर्ची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील. सध्या रामोजी फिल्म सिटीत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. यासाठी स्वातंत्र्यापूर्वीचा सेट उभारण्यात आला आहे.ALSO READ: ​Birthday Special: कधी काळी असा दिसायचा ‘बाहुबली’ प्रभास! वजन वाढवण्यासाठी रोज खायचा २० अंडी!!  प्रभासच्या या चित्रपटाचे बजेट १५० कोटी रुपये आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, प्रभास त्यामध्ये व्यस्त आहे. प्रभासच्या ‘बाहुबली-२’च्या रिलीजबरोबरच ‘साहो’चा टीजर रिलीज करण्यात आला होता. तेव्हा या टीजरला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत.