Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबली फेम राणा दुग्गबती अडकणार लग्नबंधनात, प्रेयसीचा फोटो शेअर करत दिली खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 19:16 IST

राणा आता लवकरच लग्न करणार असून त्याने सोशल मीडियावर प्रेयसीचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

ठळक मुद्देराणाने एका मुलीसोबत फोटो शेअर करत ... आणि तिने होकार दिला असे लिहिले आहे. या फोटोत असलेल्या मुलीचे नाव मिहिका बजाज असून ती इंटेरिअर डिझायनर आहे.

बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. राणाने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. राणाला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.

राणा आता लवकरच लग्न करणार असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. त्याने एका मुलीसोबत फोटो शेअर करत ... आणि तिने होकार दिला असे लिहिले आहे. या फोटोत असलेल्या मुलीचे नाव मिहिका बजाज असून ती इंटेरिअर डिझायनर आहे. ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या कंपनीची ती मालकीण असून ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. तिची आई बंटी बजाज ही ज्वेलरी डिझायनर असून क्रासाला हा त्यांचा ब्रँड प्रसिद्ध आहे.

राणाने ही गुडन्यूज दिल्याने त्याचे चाहते प्रचंड खूश आहेत. त्याच्या या फोटोला केवळ एका तासांत तीन लाख ४० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील सोशल मीडियाद्वारे राणाला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

‘बाहुबली’ सिनेमातील राणाचे पिळदार शरीर आणि दमदार पर्सनॅलिटी पाहून सगळेजण त्याच्या प्रेमात पडले होते. हे शरीर कमवण्यासाठी राणाने जिममध्ये बराच घाम गाळला होता. पण आता मात्र तो याच्या बरोबर उलट दिसत आहे. राणा दग्गुबातीने तब्बल 30 किलो वजन कमी केले आहे. त्याचा आगामी सिनेमा ‘हाथी मेरे साथी’साठी त्याने वजन कमी केले. 

राणा दग्गुबातीचे वडील सुरेश बाबू हे प्रसिद्ध निर्माते असून हैदराबादमध्ये त्यांचा रामानायडू नावाचा स्टुडिओ आहे. ते निर्माते दग्गुबाती रामानायडू यांचे पूत्र आहेत. त्यांनी सुरेश प्रॉडक्शनची सुरूवात केली होती. या प्रॉडक्शन हाऊसचे आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये काही थिएटरही आहेत. 

टॅग्स :राणा दग्गुबती