Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी १४ एप्रिलला येणार बाहुबली-२

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:02 IST

कडप्पाने बाहुबली को क्यों मारा? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील वर्षाच्या १४ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ...

कडप्पाने बाहुबली को क्यों मारा? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील वर्षाच्या १४ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. गतवर्षी रिलीज झालेला ‘बाहुबली: दी बिगनिंग’चा सिक्वल ‘बाहुबली: दी कंनक्लूजन’ पुढील वर्षी १४ एप्रिलला रिलीज होईल. चित्रपट समीक्षक आणि बॉक्स आॅफिस ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबाबत टिष्ट्वट केले. एसएस राजामौलीच्या दिग्दर्शनाखाली आलेल्या बाहुबली-२ ने बॉक्स आॅफिस कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडत विक्रमी सहाशे कोटी रूपयांची कमाई केली होती. तेलगु, तामिळ, हिंदी, मल्याळम भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. आधी ‘बाहुबली: दी कंनक्लूजन’ याचवर्षी रिलीज होणार होता. मात्र चित्रपटाच्या अनेक भागांचे पुन्हा शूट करावे लागले. यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले. या चित्रपटात प्रभास, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया आणि अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. राम्या कृष्णन, सत्यराज, नासीर, अदिवी सेश, तनिकेल्ला भरणी आदीही मुख्य भूमिकेत आहे.