Join us

‘बाहुबली २’ मध्ये डिप्पी नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 09:52 IST

दीपिका पदुकोन सध्या तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : एक्झांडर केज’ साठी शूटींग करत आहे. पण, ती ‘बाहूबली ...

दीपिका पदुकोन सध्या तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : एक्झांडर केज’ साठी शूटींग करत आहे. पण, ती ‘बाहूबली २’ मध्येही दिसणार असल्याची चर्चा सुरू होती. नंतर ही बातमी चुकीची असल्याचे सांगण्यात आले आहे. ही बातमी एवढी पसरली कशी काय ? हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.दिग्दर्शक एस.एस. राजामौली हे सध्या काही महत्त्वाच्या सीन्ससाठी रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद येथे शूटिंग करत आहेत. तसेच प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांनी शूटिंग सुरू केली आहे. तसेच राना दगुबती हे मेपासून त्यांना शूटिंगसाठी जॉईन करणार आहेत.