Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ऍपल’च्या सीईओसाठी ‘बादशाह’ची पार्टी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 18:01 IST

बॉलीवुडची भुरळ अनेकांना पडते. ग्रामीण भागातले नागरिक असो किंवा मग परदेशातले. त्यातही बॉलीवुडच्या कलाकारांची क्रेझही कमी नाही. मात्र या ...

बॉलीवुडची भुरळ अनेकांना पडते. ग्रामीण भागातले नागरिक असो किंवा मग परदेशातले. त्यातही बॉलीवुडच्या कलाकारांची क्रेझही कमी नाही. मात्र या सगळ्यात बॉलीवुडच्या बादशाहची बातच न्यारी. बॉलीवुडचा किंग शाहरुख खानला भेटण्याची अनेकांची इच्छा असते.जगभरात किंग खानचे फॅन आहेत. याला ऍपलचे सीईओ टीम कुकही अपवाद नाहीत. त्यामुळं भारत दौ-यावर आलेले टीम कुक दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याआधी बादशाह खानची भेट घेणार आहे. ऍपलच्या सीईओंच्या स्वागतासाठी किंग खान शाहरुखनंही जय्यत तयारी केलीय. बादशाह खाननं कुक यांच्यासाठी खास डिनर पार्टीचं आयोजन केलंय. बॉलीवुडच्या बादशाहची पार्टी आहे म्हटल्यावर त्याला ग्लॅमरचा तडकाही आलाच. शाहरुखच्या मन्नत या निवासस्थानी होणा-या या जंगी पार्टीसाठी बी-टाऊनचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचं समजतंय.