Join us
Daily Top 2Weekly Top 5

"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:33 IST

"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", असं बादशाह म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं होतं. आता ट्रोलिंगनंतर बादशाहने दुआ लिपाबद्दलच्या या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

रॅपर बादशहाने प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर दुआ लिपाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", असं बादशाह म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं होतं. आता ट्रोलिंगनंतर बादशाहने दुआ लिपाबद्दलच्या या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

दुआ लिपाबाबतच्या वक्तव्यानंतर बादशहाने त्याच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्याने सिंगरबाबत केलेल्या वक्तव्याबाबत माफी न मागता उलट त्याचं समर्थन केलं आहे. या वक्तव्यातून दुआ लिपाची प्रशंसा केल्याचं बादशहाने म्हटलं आहे. "मला वाटतं की एका महिलेची तुम्हाला प्रशंसा करायची आहे. तर माझ्या मुलांची तू आई व्हावी, अशी माझी इच्छा आहे. हे तिला सांगणं याच्यापेक्षा सुंदर कॉम्प्लिमेंट असूच शकत नाही. यातून माझे विचार नाहीत तर तुमचे विचार समोर आले आहेत", असे त्याने म्हटलं आहे. 

बादशहाने शुक्रवारी(६ जून) त्याच्या X अकाऊंटवरुन ट्वीट करत दुआ लिपाचं नाव आणि हार्ट इमोजी पोस्ट केले होते. त्यानंतर बादशहा आणि दुआ लिपा हे कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार का? असा प्रश्न चाहत्याने विचारला होता. त्याला रिप्लाय देताना बादशहाने दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत असं म्हटलं होतं. त्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं.  

टॅग्स :बादशहासेलिब्रिटी