Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा सिक्वेल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 11:45 IST

 आलिया भट्ट आणि वरूण धवन यांनी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ २०१४ केल्यानंतर त्यांचे चाहते फारच उत्साहित झाले. नुकतेच ‘बद्रिनाथ ...

 आलिया भट्ट आणि वरूण धवन यांनी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ २०१४ केल्यानंतर त्यांचे चाहते फारच उत्साहित झाले. नुकतेच ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चे फर्स्ट शेड्यूल संपले आहे.आलिया भट्ट एका मुलाखतीत बोलताना म्हणाली,‘ हा चित्रपट पूर्णपणे वेगळा आहे. हम्प्टी शर्माच्या दुल्हनियेचा या दुल्हनसोबत काहीही संबंध नाही. हा त्याचा सिक्वेल नाही. तर पुर्णपणे वेगळे कथानक आहे. ही देखील एक लव्हस्टोरीच आहे.मात्र, वरूण धवन आणि दिग्दर्शक शशांक खैतान यांच्यासह पुन्हा एकदा काम करायला मिळणार आहे. साऊंड सिस्टीम, फोटोग्राफी हे सर्वच अगदी एकसारखं आहे. कुटुंबियांसमवेत काम केल्यासारखेच वाटते आहे.